शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपचे आमदार, शिवसेनेला पुन्हा आपला मतदारसंघ मिळणार?

ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र याच बालेकिल्ल्याला 2014 च्या निवडणुकीत  खिंडार पाडत भाजपचे संजय केळकर आमदार म्हणून निवडून आले. शिवसेनेला हा घाव जिव्हारी लागला आहे. आता शिवसेनेने या मतदारसंघावर दावा केल्याचं समजतंय. भाजपने हा मतदार संघ शिवसेनेला सोडावा अशी सेनेच्या स्थानिक नेतेमंडळींची मागणी आहे. मात्र मतदार संघ सेाडण्यास भाजप तयार नसल्याचे […]

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपचे आमदार, शिवसेनेला पुन्हा आपला मतदारसंघ मिळणार?

ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र याच बालेकिल्ल्याला 2014 च्या निवडणुकीत  खिंडार पाडत भाजपचे संजय केळकर आमदार म्हणून निवडून आले. शिवसेनेला हा घाव जिव्हारी लागला आहे. आता शिवसेनेने या मतदारसंघावर दावा केल्याचं समजतंय.

भाजपने हा मतदार संघ शिवसेनेला सोडावा अशी सेनेच्या स्थानिक नेतेमंडळींची मागणी आहे.

मात्र मतदार संघ सेाडण्यास भाजप तयार नसल्याचे कळतंय.

भाजप आणि शिवसेनेची युती झाली, तर ओवळा-माजीवाडा हा मतदारसंघ ठाणे शहराच्या बदल्यात सोडण्याची तयारी शिवसेने केल्याची चर्चा आहे.

ओवळा माजीवाडा मतदारसंघातून शिवसेनेचे प्रताप सरनाईक दोनवेळा निवडून आले आहेत.

त्यामुळे जागावाटपात हा मतदारसंघ कुणाकडे जातो, याचीच खरी उत्सुकता आहे.

ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो.

1990 पासून ते 2009 पर्यंतच्या काळात केवळ शिवसेनेचा आमदार निवडून आला आहे.

2009 ला या मतदारसंघाचं विभाजन झालं आणि केवळ जुनं ठाणे या मतदारसंघात ठेवलं गेलं.

2014 च्या निवडणुकीत मित्रपक्ष असलेल्या भाजपनेच सेनेच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडलं.

भाजपचे संजय केळकर हे 12588 मतांनी विजयी झाले होते.

बालेकिल्ला हातातून निसटल्याने हा घाव शिवसेनेच्या जिव्हारी लागला असूनत्यामुळे पुन्हा ठाणे शहर मतदारसंघ आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number