मुंबई : शिवसेनेचा आज 60 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा सोहळा गोरेगाव येथील नेस्को मैदानावर पार पडत असून दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सोहळा हा मांटुगा येथील षण्मुखानंद सभागृहात पार पडत आहे. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटासह भाजपवर निशाणा साधला. त्यांनी पक्षप्रमुख पदाबाबत महत्त्वाचे विधान केले.
उद्धव ठाकरेंचे सविस्तर भाषण –
आज शिवसेनेचा 60 वर्धापन दिन. शिवसैनिक ही देणगी माझ्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. एकही शिवसैनिक खचलेला नाही. उलटा पेटलेला आहे. अनिता कांबळेला कसं तुडवलं, हे तुम्हाला माहिती आहे. आदेश बाळासाहेब कधीच देऊन गेलेत. माझा जीव ओवाळला तरी मी तुमचा सत्कार करू शकत नाही. ही साठ वर्ष साधी नव्हती. बाळासाहेब इंद्रजीत गुप्तांना बोलले होते, आम्ही सत्तेसाठी नाही सत्ता आमच्यासाठी जन्माला आली आहे. या साठ वर्षांमध्ये आणीबाणीसुद्धा आली. या आठवणीसुद्धा बाळासाहेबांनी सांगितल्या आहेत. रजनीश पटेल शिवसेनेच्या मुळावर उठला होता.
तीस वर्ष भाजपात राहून विलीन झालो नाही. तर काँग्रेसमध्ये कोण होणार. मला आता भीती वाटते. भाजप मिदें सेनेत विलीन होईल. उद्या आदेश येईल, जा मिंदेंची दाढी खाजवा. माझ्यापुढे टू थर्ड मॅच्युरिटी अजिबात नाही. तुम्हाला मुलं होत नाही, तर तुमच्या वांझोटेपणावर तुम्ही उपचार करा. आमची पोर पुरवणारी टोळी नाही. मी जर कोणाला भेटत नव्हतो, तर तू निवडून कसा आलास. लोकसभेसाठी 6 ते 10 सभा मी घेतल्या होत्या. मी गर्वाने कधी बोलत नाही. पारंबीला नाहीतर तुझ्या मागच्या वडाची पूजा केली आहे. मराठी आणि हिंदूंच्या रक्तामध्ये स्वाभिमान रुजवला. त्या रक्तामध्ये भेसळ कुठून आणली. दुसऱ्याचे बाप चोरावे लागतात. शिवसेनेच्या स्थापनेचा नारळ माझ्यापासून फुटला आहे. ठाकरे कुटुंबावर जे बोलतात त्यांनी जरा तरी पाहिलं का, ठाकरे कुटुंब काय काय भोगतंय? महात्मा ज्योतिबा फुले आणि शाहूंवर तर शेणवारांनी आणि धोंडबार झाली आहे. करमट आणि ब्राह्मणी वृत्ती जुन्या वाईट प्रथा मोडून काढाव्या यासाठी प्रबोधनकार ठाकरे उभे राहिले होते. त्यावेळेला आमच्या घरावर मेलेली कुत्री आणि कचऱ्याचे ढीग फेकले गेले. आज माझ्यावर टीका होते, माझ्या पत्नीवर टीका होते. आदित्यवर घाणेरडे आरोप केले जातात. तेजसवरही आरोप होत आहेत.
भाजपने दगा तिला तेव्हा मला मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारावी लागली. मातोश्रीने फक्त वाढायचं काम करायचं, जेवायचं काम ते करणार. मी मंत्री झालो पाहिजे, मुख्यमंत्री झालो पाहिजे, माझे दिवटे मंत्री झाला पाहिजे. पण सोसायचा किती. यांच्यापैकी एकही छातीची ढाल करून उभा राहिला होता का?. मोदींचा चेहरा न वापरता आपले 9 खासदार डौलाने निवडून आले होते. काही थोडक्यात गेले आणि एक सीट चोरली. आज परत फोडाफोडी कशासाठी करतायं. सत्ता पिपासून किती व्हायचं. दोन अडीच लाख सीमा सुरक्षा दल कुठे घुसवलं. बंगालमध्ये एका महिलेला हरवण्यासाठी. हे फौज मणिपूरमध्ये का नाही घुसवली. बारा वर्षे होऊन गेली पाकव्याप्त काश्मीरमध्ये का नाही घुसवली. घुसून दाखवा, शिवसेना तुम्हाला जाहीर पाठिंबा देते. तुमच्यापेक्षा जास्त आम्ही देशप्रेमी आहोत. माझ्या आजोबांना विरोध करणारे गोमूत्रदारी जे होते, त्या प्रवृत्ती आता परत बोकाळल्या आहेत. मी मागेच सांगितलं होतं, मशाल वेगळी ठेवा आणि भगवा वेगळा ठेवा.
आज शेतकरी रडत आहे. त्याच्या मनाला हमीभाव नाही. मात्र आमदार – खासदारांचा हमीभाव ठरला आहे. ते कर्जमाफी म्हणतात, आपण कर्जमुक्ती बोलतोय. नुसते आमदार – खासदार विकत द्यायचे आहेत. एवढे पैसे आहेत तुमच्याकडे. 80 लाख महिलांची ओवाळणी काढून घेतली आहे. मेहनत केल्यावर जाब विचारणे अधिकार तुमचा आहे, तुम्ही तो बजावत नाही आहात. समोरून पैशाचा महापूर होता. यांच्या वरच्या गद्दारीचा ठपका पुसायला किती वर्ष लागतील. काँग्रेसनेही आपल्याला छळलच. आपण टीका कुणासाठी केली. भाजपसाठी, भाजपसोबत होता म्हणून. बाबरी पडली तेव्हा भाजपवाले पळून गेले होते. काँग्रेसने आपली माणसं फोडली होती. पण त्यांच्यापैकी कोणाला मुख्यमंत्री केलं नव्हतं. काँग्रेसने आपल्याला असंच छळलं होतं. भाजप – शिवसेना मुळासकट उखडून टाकायला निघाली आहे. राजकारण एवढं गढूळ कधी झालं नव्हतं. तुमचं बोट धरलं नसतं, तर तुम्ही तिथेच गाडले गेला असता, त्यांना आज तुम्ही संपवायला निघाला आहात.
मला पदाची हाव असती, तर मी विधान परिषदेत गेलो असतो. गेली 13-14 वर्षे मी पक्षप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. माझ्यावर कार्यकर्त्यांना वेळ देत नसल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, शिवसैनिकांना तसे वाटत असेल, तर मी पक्षप्रमुख पदाचा राजीनामा द्यायलाही तयार आहे. ज्या दिवशी तुम्हाला वाटेल, त्या दिवशी हे पद सोडल्याशिवाय राहणार नाही.