Sanjay Raut on Operation Tiger : ‘रिक्षात फिरण्याची औकात नव्हती, त्यांची विमानात फिरण्याएवढी हिंमत ठाकरेंच्या नावामुळे आलीय’; संजय राऊतांचा घणाघात

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या झपाट्याने घडामोडी घडत असून शिवसेना उबाठा गटाचे खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या बातम्यांना उधाण आले आहे. ठाकरे गटाचे 9 पैकी 6 खासदार येत्या 19 जूनला शिवसेनेच्या वर्धापन दिनी शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याचे समजते. यातच आता खासदार संजय राऊत यांनी पक्ष सोडून जाणाऱ्यांना जोरदार टोला लगावला आहे. यापूर्वीही एकनाथ […]

Sanjay Raut on Operation Tiger : ‘रिक्षात फिरण्याची औकात नव्हती, त्यांची विमानात फिरण्याएवढी हिंमत ठाकरेंच्या नावामुळे आलीय’; संजय राऊतांचा घणाघात

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या झपाट्याने घडामोडी घडत असून शिवसेना उबाठा गटाचे खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या बातम्यांना उधाण आले आहे. ठाकरे गटाचे 9 पैकी 6 खासदार येत्या 19 जूनला शिवसेनेच्या वर्धापन दिनी शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याचे समजते. यातच आता खासदार संजय राऊत यांनी पक्ष सोडून जाणाऱ्यांना जोरदार टोला लगावला आहे. यापूर्वीही एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांवर 50 खोके अशी टीका करणाऱ्या राऊतांनी आता पुन्हा एकदा खासदारांसाठी एक्स पोस्ट करत  जहरी टीका केली आहे. प्रत्येक गोष्टीचा हिशोब केला जाईल, असा इशारा त्यांनी पक्ष सोडणाऱ्या खासदारांना दिला आहे. 

हेही वाचा : MP Omraje Nimbalkar : राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून आलेले खासदार ठाकरेंची साथ सोडणार?, शिवसेना प्रवेशाबाबत निर्यण काय?; जाणून घ्या ताजी घडामोड

संजय राऊतांची मार्मिक पोस्ट –

नांदेड विमानतळावर एक चार्टड विमान उतरते 
ऑपरेशन नावाखाली दोन खासदारांना उचलून निघून जाते 
यांची रिक्षात फिरण्याची औकात नव्हती 
खासगी विमानाने फिरण्या एवढी किंमत ठाकरे नामा मुळे वाढली 
प्रत्येक गोष्टीचा हिशोब केला जाईल ।
डरपोक कोल्ह्यांच्या पळवा पळविला 
का म्हणता?

महाराष्ट्राच्या राजकारणात झपाट्याने घडामोडी घडत आहेत. ऑपरेशन टायगरची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असतानाच आता ठाकरे गटाचे खासदार हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे 9 पैकी 6 खासदार त्यांची साथ सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या असून सध्या हे खासदार दिल्लीला रवाना झाल्याचे समजते. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाला बळ मिळणार असून ऑपरेशन टायगरला यश आल्याचे बोलले जात आहे. शिवसेना उबाठा गटाच्या काही खासदारांनी आज, बुधवारी लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांची वेळ घेतल्याची माहिती समोर येत आहे. हे खासदार लोकसभा अध्यक्षांना भेटून वेगळा गट स्थापन केल्याचा दावा करणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील काल रात्री दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. येत्या दोन दिवसात शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होणार आहे. अशावेळी दिल्लीवारीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number