सध्या राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधीपक्षासह सत्ताधारीपक्ष देखील कामाला लागले आहेत. अशातच गेल्या काही दिवसांपासून महायुतील अंतर्गत वाद पेटल्याचे पाहायला मिळत आहेत. एकीकडे पक्षप्रवेशावरुन शिवसेना शिंदे गटातील आमदार आणि नेते भाजपवर नाराजी दाखवत असताना, दुसरीकडे शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील वाद देखील पेटला आहे.
सुनिल तटकरे यांनी भाजपच्या दिशेने वाटचाल केली असा गौप्यस्फोट शिंदेंच्या शिवसेनेतील आमदार महेंद्र दळवी यांनी केला आहे. पार्थ पवारांना अडकवण्यात सुनिल तटकरेंचा हात असल्याचा धक्कादायक विधान महेंद्र दळवी यांनी केलं आहे. यावेळी महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटातील नेते सुनिल तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
हेही वाचा- Malegaon Crime Case : “न्याय द्या अन्यथा रस्त्यावर उतरू” मनोज जरांगे पाटीलांचा सरकारला अल्टिमेटम
यावेळी महेंद्र दळवी म्हणाले की, “त्याच पक्षात रहायचं आणि त्यांच्याच मुलांना बदमान करायच… कारण इथली बॅग भरली आहे, गल्ली टू दिल्ली… आता कमळाच्या दिशेने वारी चालली आहे, आणि हे सत्य आहे… काही लपून राहणार नाही. आतापर्यंत त्या व्यक्तीचा राजकीय प्रवास बघितला. तरीही चीटिंगच म्हणा येईल… कारण, ज्या नेत्याच्या आश्रयाखाली आपण काम करायच त्या नेत्यालाच फसवायच, ही संस्कृती आहे आता ही बंद केली पाहिजे… म्हणून कोकणाच नाव बदनाम होऊ नये म्हणून अशा लोकांना हद्दपार करण काळाची गरज आहे.”