Shiv Sena Symbol Case : ठाकरे की शिंदे! शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाला मिळणार? सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी

नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर आज सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठासमोर महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयाला आज, बुधवारी दुपारी 2 वाजता या प्रकरणावर सुनावणी घेण्याची विनंती केली, जी कोर्टाने मान्य केली आहे. बार कौन्सिल ऑफ इंडिया आणि डिजिटल अरेस्टशी संबंधित इतर प्रकरणांच्या सुनावणीत वेळ गेल्यामुळे या प्रकरणाला विलंब झाला होता. मांडण्यात […]

Shiv Sena Symbol Case : ठाकरे की शिंदे! शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाला मिळणार? सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी

नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर आज सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठासमोर महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयाला आज, बुधवारी दुपारी 2 वाजता या प्रकरणावर सुनावणी घेण्याची विनंती केली, जी कोर्टाने मान्य केली आहे. बार कौन्सिल ऑफ इंडिया आणि डिजिटल अरेस्टशी संबंधित इतर प्रकरणांच्या सुनावणीत वेळ गेल्यामुळे या प्रकरणाला विलंब झाला होता. मांडण्यात आलेल्या भूमिकेला आतापर्यंत प्रत्येक स्तरावर यश मिळाले असून, सुप्रीम कोर्टातही योग्य न्याय मिळेल, असा आत्मविश्वास व्यक्त करण्यात आला आहे. 

हेही वाचा : Vehicle Insurance Policy : SC ने नवीन वाहनांच्या थर्ड-पार्टी विमा संरक्षणाची मुदत वाढवली; नवीन कारसाठी 4 तर दुचाकींसाठी 6 वर्षांचा विमा सक्तीचा

मागील सुप्रीम कोर्टासमोर कपील सिब्बल यांनी उद्धव ठाकरेंची बाजू मांडली होती. त्यानंतर न्यायालयाने हे प्रकरण 4 ऑगस्ट रोजी सुनावणीसाठी ठेवले होते. त्यानुसार काल सुनावणी पार पडली आहे. पक्षाचे मूळ चिन्ह धनुष्यबाण आपल्यालाच मिळेल. चिन्ह आपल्याला मिळालं नाही तर ते गोठवलं जाईल, असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी संपर्क प्रमुखांच्या बैठकीत केलं होतं. एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये ऐतिहासिक बंड करत अखंड शिवसेनेतील 40 पेक्षा जास्त आमदार फोडले. यानंतर ठाकरे सेना आणि शिंदेंची शिवसेना यामध्ये पक्षाचं नाव आणि चिन्हावरुन जोरदार वाद सुरु आहे. याप्रकरणी सुप्रीम कोर्टात 30 जुलैला पुन्हा सुनावणी पार पडली. ठाकरे सेनेच्या वतीनं ज्येष्ठ वकील कपील सिब्बल यांनी युक्तिवाद केला. 2018 मध्ये झालेल्या पक्षांतर्गत निवडणुकांचे पुरावे सादर करण्यात आल्याचं सिब्बल यांनी निदर्शनास आणलं. तसंच उद्धव ठाकरेंनीच 2018 मध्ये एकनाथ शिंदेंची गटनेतेपदी नियुक्ती केल्याचंही सिब्बल यांनी स्पष्ट केलं. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number