Deepak Kesarkar : ‘पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये सहभागी होणार’; मोदी-पवार भेटीनंतर शिवसेना आमदार दीपक केसरकरांचं वक्तव्य

सिंधुदुर्ग : शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, शिक्कामोर्तब तोपर्यंत होत नाही जोपर्यंत प्रत्यक्षामध्ये पाठिंबा जाहीर करत नाही. सुप्रिया सुळे यांची मी मुलाखत पाहिली. महिला विधेयक आणत आहोत. अधिकची जागा निर्माण होत असेल आमचा पाठिंबा राहील. कंडीशनर पाठिंबा म्हणता येईल. कंडिशनल पाठिंबा […]

Deepak Kesarkar : ‘पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये सहभागी होणार’; मोदी-पवार भेटीनंतर शिवसेना आमदार दीपक केसरकरांचं वक्तव्य

सिंधुदुर्ग : शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, शिक्कामोर्तब तोपर्यंत होत नाही जोपर्यंत प्रत्यक्षामध्ये पाठिंबा जाहीर करत नाही. सुप्रिया सुळे यांची मी मुलाखत पाहिली. महिला विधेयक आणत आहोत. अधिकची जागा निर्माण होत असेल आमचा पाठिंबा राहील. कंडीशनर पाठिंबा म्हणता येईल. कंडिशनल पाठिंबा वेगळा असतो आणि एनडीएमध्ये समाविष्ट होणे वेगळा असतो. पवारसाहेब खूप अनुभवी आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा देशाच्या हितासाठी झाला सर्वांनीच स्वागत केले पाहिजे.  

हेही वाचा : Gulabrao Patil: ‘शेतकऱ्यांना त्रास झाला तरी चालेल…’ मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ

पुढे संजय राऊतांच्या टीकेला उत्तर देताना केसरकर म्हणाले की, देश विघातक हा शब्द मुळात चुकीचा आहे. परदेशामध्ये भारतीय असल्यामुळे आदराने पाहिलं जातं. पूर्वी भारतीय म्हणजे गरीब आपल्यापेक्षा कमी दर्जाचा मनुष्य असंच बघितलं जायचं. आता ती परिस्थिती जगभरामध्ये राहिलेली नाही. शस्त्रास्त निर्मितीमध्ये जगाच्या दुसऱ्या क्रमांकावर आहोत. राष्ट्र प्रगतीच्या दिशेने जातोय. अनेक ठिकाणी रस्ते फोर लेन झालेले आहेत. जगातील सर्वात मोठे टनेल भारतामध्ये आहेत. देशाचा जरा तरी स्वाभिमान ठेवा. मर्यादेचं पालन प्रत्येकाने केलं पाहिजे असं मला वाटतं. मोदी साहेबांची दूरदृष्टी होती.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number