Shinde-Thackeray Shiv Sena Yuti : मोठी अपडेट समोर! दोन्ही शिवसेना एकत्र येणार? दानवेंच्या ‘त्या’ विधानानंतर चर्चांना बळ

सत्तास्थापनेबाबत छत्रपती संभाजीनगरचे राजकारण चर्चेत आलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी शिंदेसेना आणि उद्धवसेना एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Shinde-Thackeray Shiv Sena Yuti : मोठी अपडेट समोर! दोन्ही शिवसेना एकत्र येणार? दानवेंच्या ‘त्या’ विधानानंतर चर्चांना बळ

गेल्या मागील महिन्यात राज्यात पार पडलेल्या जिल्हा परिषद, महापालिकेच्या निवडणुकीनंतर सत्तास्थापनेबाबत राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. अशातच सत्तास्थापनेबाबत छत्रपती संभाजीनगरचे राजकारण चर्चेत आलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी शिंदेसेना आणि उद्धवसेना एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. येथे जिल्हापरिषदेच्या अध्यक्षपदासाठी चांगलीच रस्सीखेच सुरू असून दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबतच्या चर्चा केल्या जात आहे. यावेळी अंबादास दानवे म्हणाले होते की, आमचे काही सदस्य सत्तेत सहभागी होण्यासाठी इच्छुक आहेत, सोबतच आमच्या सदस्यांची तशी इच्छा असली तरीही अद्याप तशी कोणतीही चर्चा झालेली नाही. दरम्यान शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केलेल्या विधानामुळे या चर्चांची शक्यता अधिक तीव्र केली जात आहे. 
हेही वाचा- Maharashtra Electricity Rates: मुख्यमंत्र्यांचा ऐतिहासिक निर्णय; महाराष्ट्रात वीजदर वाढणार नाही, दरवर्षी 1.2 टक्क्यांनी कमी होणार

अध्यक्षपदासाठी मोठी अपडेट समोर
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, अध्यक्षपद शिंदेसेनेला तर उपाध्यक्षपद उद्धवसेनेला देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. दरम्यान, उद्धवसेनेचे दोन सदस्य भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाने आपल्या सदस्यांसाठी व्हीप जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. 63 सदस्यांच्या जिल्हा परिषदेत उद्धवसेनेचे 9 सदस्य असून त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच आता अध्यक्षपदी कोण विराजमान होणार? याबाबत उत्सुकता वाढली आहे.

हेही वाचा- Mumbai Local Mega Block : गुढीपाडव्याच्या दिवशी रेल्वेवर विशेष ब्लॉक; घराबाहेर पडण्यापूर्वी 'हे' वेळापत्रक नक्की वाचा
छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीमध्ये भाजपने सभापती बसवला. या वेळी उद्धवसेनेचे दोन सदस्य गैरहजर ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. याचा बदला घेण्यासाठीच उद्धवसेनेने शिंदेसेनेला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. उबाठाचे काही सदस्य भाजपच्या बाजूने फुटणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. सदस्यांना विकासकामांच्या नावावर अतिरिक्त निधी देण्याचे आश्वासन, भाजप आणि शिवसेनेने फोडलेल्या सदस्यांना सभापतीपदासह विविध समित्यांवर घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. काही सदस्यांना अतिरिक्त निधी देण्याचेही आश्वासन देण्यात आले आहे. काही सदस्यांना त्यांच्या व्यवसायात व्यत्यय निर्माण करण्याच्या धमक्याही दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. सदस्यांना आपल्याकडे घेण्यासाठी या निवडणुकीत साम, दाम, दंड, भेदाचा वापर करण्यात आला आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number