नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदांसाठी आज भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाने आपले अर्ज दाखल केले. भाजपातर्फे सुजाता सुरज पाटील आणि उपमहापौरपदासाठी दशरथ भगत यांनी अर्ज दाखल केले. तर शिवसेना शिंदे गटदेखील संख्याबळ नसताना महापौर आणि उपमहापौर निवडणूक लढविणार आहे. शिवसेना शिंदे गटातर्फे महापौरपदासाठी सरोज पाटील तर उपमहापौरपदासाठी आकाश मढवी यांनी अर्ज दाखल केला आहे.
महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल दि. 5 फेब्रुवारी 2026 रोजी, सकाळी 11 वा. होणा-या नवी मुंबई महानगरपालिका महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणूकीसाठी आज 1 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत महापालिका सचिव श्रीम. संघरत्ना खिल्लारे यांचेकडे… pic.twitter.com/JeCl9pK5RY — Navi Mumbai Municipal Corporation (@NMMConline) February 1, 2026
नवी मुंबई महानगरपालिकेत एकूण 111 नगरसेवक असून आणि भाजपकडे 65 नगरसेवक आहेत. एका अपक्षाच्या पाठिंब्याने भाजपच्या नगरसेवकांची संख्या 66 झाली आहे. शिवसेना शिंदे गटाकडे 42 नगरसेवक आहेत, शिवसेना (उबाठा) दोन आणि मनसेकडे एक नगरसेवक आहे. बहुमतासाठी लागणारा 56 हा आकडा भाजपने गाठला असून 5 फेब्रुवारी रोजी महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक पार पडेल.