कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी मूळ सूत्रधार बाजूला ठेवून बुद्धिजीविना अटक हे तत्कालीन राज्य सरकारने पोलिसांच्या मदतीने घडवलेले षडयंत्र आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलं. कोरेगाव- भीमाबाबत शरद पवार यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून याप्रकरणी SIT नेमावी अशी मागणी केली.
कोरेगाव भीमा दंगलीतील मुख्य सुत्रधारांना पाठीशी घालून मुख्य मुद्यांवरून लक्ष हटविण्याचे षडयंत्र असा गंभीर आरोप शरद पवार यांनी केलाय.
अटक झालेल्या सुधीर ढवळे यांनी जर्मन कवीची अनुवादित कविता वाचली होती.
‘जब जुल्म हो तो बगावत होनी चाहीये शहर मैं
अगर बगावत ना हो तो बेहतर है की रात ढलने से पहले ये शहर जल कर राख हो जाये…’
एवढ्यासाठी त्यांना अटक केली गेली.
डॉ.आनंद तेलतुंबडे हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातजावई आहे,त्यांच्यावर कारवाई करण्यात आली
‘गोलपीठा’ मध्ये नामदेव ढसाळ यांची कविता आहे. तीचा साहित्यिक अर्थाने बोध घेण्याऐवजी ते देशद्रोह आणि समाज विघातक म्हणून निष्कर्ष काढू नये, असं पवारांनी म्हटलंय.
पोलीस तपस यंत्रणेने संगणकीय उपकरणांमध्ये छेडछाड केली, पुरावे नष्ट करणे आणि खोटे पुरावे तयार करणे अशा तक्रारी मला प्राप्त झाल्या आहेत. याची खोलात जाऊन चौकशी आवश्यकता आहे
कोरेगाव भीमा दंगलीस एल्गार परिषदेतील चिथावणीखोर असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. यातील काही जणांच्या माओवाद्यांशी संबंध असण्याच्या संशयावरून कारवाई करण्यात आली. यात काही बुद्धिजिवी आणि प्रतिष्ठित लोकांचं समावेश आहे. म्हणून याप्रकरणी SIT नेमावी अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे.