Sharad Pawar: ‘एक- दोन दिवसांच्या बचतीने काही होणार नाही…’, इंधन बचतीवरून शरद पवारांनी नेमका कोणावर साधला निशाणा?

ताफा सोडणाऱ्या मंत्र्यांनी दिखावा करू नये, त्यामध्ये सातत्य दाखवावं असा सल्लाही यावेळी शरद पवारांनी दिला. एक किंवा दोन दिवसांच्या बचतीने काही होणार नाही.

Sharad Pawar: ‘एक- दोन दिवसांच्या बचतीने काही होणार नाही…’, इंधन बचतीवरून शरद पवारांनी नेमका कोणावर साधला निशाणा?

मुख्यमंत्र्यांच्या आज बुलेटवरून मोठ्या प्रमाणात राजकारण मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहेत. सर्व चर्चा सुरू असताना शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी आखाती युद्धामुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईमुळे पंतप्रधानांनी देशातील जनतेला काटकसर करण्यास देशात सध्या गंभीर स्थिती असून पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी अशी मागणीही शरद पवारांनी केली. 

शरद पवार म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनानंतर कुणी गाड्यांचा ताफा कमी करतोय तर कुणी पायी चालतोय असं दिसतंय. पण ताफा सोडणाऱ्या मंत्र्यांनी दिखावा करू नये, त्यामध्ये सातत्य दाखवावं असा सल्लाही यावेळी शरद पवारांनी दिला. एक किंवा दोन दिवसांच्या बचतीने काही होणार नाही. आता मोदींचं आवाहन त्यांचे नेते किती दिवस पाळतात हे पाहावं लागेल, असंही शरद पवार म्हणाले.

मंत्र्यांच्या ताफ्यात 17-17 गाड्या कशाला हव्यात? त्या गाड्या कमी करुन 7-8 वर आणलं जात आहे आणि दिखावा केला जात आहे. गेल्या चार वर्षांपासून माझ्या ताफ्यात फक्त तीनच गाड्या आहेत, माझ्या ताफ्यात बदल करण्याची विनंती मी केली आहे, असं शरद पवार म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्री आज मंत्रालयात बाईकने आले. त्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले की, मुख्यमंत्री उद्यापासून रोज मंत्रालयात बाईकवरून आले तर लोक गांभीर्याने घेतील.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number