मुंबई : मविआत कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे. उद्धव यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. पण मुंबई उच्च न्यायालयाचा बंद विरोधात निकाल आला आणि शरद पवारांनी संधी साधली. उद्धववर कुरघोडी करत शरद पवारांनी बंद मागे घेण्याचे आवाहन केले. ट्वीट करत शरद पवारांनी बंद मागे घेण्याचे आवाहन केले. याआधी मुंबई उच्च न्यायालयाने बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला. यानंतर शरद पवारांनी बंद मागे घेण्याचे आवाहन केले.
बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या दि. २४ ऑगस्ट २०२४ रोजी राज्यव्यापी सार्वजनिक बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या दोन अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता. परिणामी समाजातील सर्व स्तरांतून याबाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या. या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा हा… — Sharad Pawar (@PawarSpeaks) August 23, 2024