‘शरद पवार २०२४मध्येही चमत्कार घडवतील’ – नवाब मलिक

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेचा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समाचार घेतला आहे. पवारांचे राजकारण संपल्याची टीका फडणवीसांनी केली होती. मात्र त्यावेळी चमत्कार घडला होता आणि आताही फडणवीस टीका करत आहेत. त्यामुळे २०२४मध्येही चमत्कार घडवून आणू, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे. विरोधी पक्षनेते […]

‘शरद पवार २०२४मध्येही चमत्कार घडवतील’ – नवाब मलिक

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेचा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समाचार घेतला आहे. पवारांचे राजकारण संपल्याची टीका फडणवीसांनी केली होती. मात्र त्यावेळी चमत्कार घडला होता आणि आताही फडणवीस टीका करत आहेत. त्यामुळे २०२४मध्येही चमत्कार घडवून आणू, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘देवेंद्र फडणवीस ज्यावेळी टीका करतात, त्यावेळी चमत्कार घडतो’, असे नवाब मलिक म्हणाले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार किंवा राष्ट्रवादीचे नेते यांनी पवार पंतप्रधान होतील, असा कुठलाही दावा केलेला नाही. तर शरद पवार हे देशातील सर्व पक्षांना एकत्र करण्यासाठी काम करत आहेत. त्यामुळे विरोधकांच्या एकीमुळे मोदी सरकार सत्तेबाहेर जाईल, असे नवाब मलिक म्हणाले.

शरद पवार यांच्या वाढवदिवसाच्या दिवशी देवेंद्र फडणवीसांनी पवारांना शुभेच्छा दिल्या की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून ते पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहत आहेत. परंतु स्वप्न पाहण्यास कुणालाही बंदी नाही. राष्ट्रवादी पक्ष दहा खासदारांच्या पलीकडे जाऊ शकला नाही, त्यांना माझ्याकडून खूप शुभेच्छा, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानपदावरून पवारांवर केली. त्यामुळे फडणवीस यांच्या टीकेवर नवाब मलिकांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number