Sharad Pawar NCP : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत ठाकरे गटाची पुनरावृत्ती? दोन गट पडल्याने मोठा सस्पेन्स; मोठी अपडेट समोर

ठाकरेंनतर आता राष्ट्रवादी शरद पवार यांचा पक्षाला देखील मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तावली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीत दोन मतप्रवाह असल्याचे उघड झाले आहे.

Sharad Pawar NCP : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत ठाकरे गटाची पुनरावृत्ती? दोन गट पडल्याने मोठा सस्पेन्स; मोठी अपडेट समोर

एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत ऑपरेश टायगर राबवल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठं खिंडार पाडलं आहे. ऑपरेश टायगरनंतर मविआमधील प्रत्येक पक्षाने अॅक्शन मोडमध्ये येत आपल्या खासदार, आमदारांसह पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्यांवर नजर ठेवायला सुरुवात केली आहे. अशातच ठाकरेंनतर आता राष्ट्रवादी शरद पवार यांचा पक्षाला देखील मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तावली जात आहे. शरद पवार यांच्या पक्षात गेल्या अनेक दिवसांपासून अंतर्गत घुसफुसीने राजकीय वर्तूळात चर्चांना विषय मिळाला आहे. 
हेही वाचा- Nana Patole: 'भगवान श्रीरामाला लुटणारी व्यवस्था आता गुरुद्वारा लुटायला निघालीये…'; नाना पटोलेंचा सरकारवर खळबळजनक आरोप

समोर आलेल्या माहितीनुसारह, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीत दोन मतप्रवाह असल्याचे उघड झाले आहे. यावेळी पक्षातील एक गट हा राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षासोबत विलीनीकरणाची भूमिका व्यक्त करत आहे. तर दुसऱ्या गटाला एनडीएसोबत जाण्याची इच्छा असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात यातील पहिल्या गटाची अशी ठाम भूमिका आहे की, पक्षाचे अस्तित्त्व टिकवून ठेवण्यासाठी आणि भाजपविरोधी लढाई मजबूत करण्यासाठी पक्षाने पूर्णपणे काँग्रेसमध्ये विलीन व्हावे.

या विलीनीकरणामुळे आगामी निवडणुकांमध्ये मोठी राजकीय ताकद निर्माण करता येईल. तर दुसऱ्या गटाची भूमिका आहे की, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उभ्या केलेल्या या पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व कायम राखले पाहिजे. यामुळे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत वर्तुळात या दोन गटांमध्ये सुप्त संघर्ष सुरु असल्याचे समजते. दरम्यान वरिष्ठ पातळीवरून दोन्ही गटांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्यातरी यासर्व प्रकरणावर पक्षातून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पक्षातील नेतेमंडळी याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number