एकीकडे विविध मागण्यांसाठी किसान महामोर्च्याला आक्रमक स्वरुप प्राप्त झालं आहे. तर दुसरीकडे जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्यातील सरकारी आणि निम सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. शेतकरी आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. दरम्यान, ‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीत दिलेल्या मुलाखतीत राज्यातील आंदोलनांबाबत राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. राज्यातील आंदोलनांमागे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद […]
एकीकडे विविध मागण्यांसाठी किसान महामोर्च्याला आक्रमक स्वरुप प्राप्त झालं आहे. तर दुसरीकडे जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्यातील सरकारी आणि निम सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. शेतकरी आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. दरम्यान, ‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीत दिलेल्या मुलाखतीत राज्यातील आंदोलनांबाबत राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. राज्यातील आंदोलनांमागे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नसल्याचे वक्तव्य रोहित पवार यांनी केले आहे.