Sharad Pawar Health Update: शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; सिटीस्कॅन आणि रक्त तपासणीनंतर डॉक्टर नेमकं काय म्हणाले?

ज्येष्ठ नेते शरद पवार यांना अशक्तपणा आणि डिहायड्रेशनमुळे पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Sharad Pawar Health Update: शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; सिटीस्कॅन आणि रक्त तपासणीनंतर डॉक्टर नेमकं काय म्हणाले?

पुणे: राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी समोर येत असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा एकदा पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबतची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस तसेच सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे.

काही दिवसांपूर्वी शरद पवार यांना खोकला आणि कफचा त्रास जाणवत असल्यामुळे त्यांना रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने ते पुन्हा राजकीय कामकाजात सक्रिय झाले होते. मात्र पुढील वैद्यकीय तपासणी आणि उपचारांसाठी त्यांना आज पुन्हा रुबी हॉल क्लिनिकमध्ये अ‍ॅडमिट करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा: Beed Crime News: परळीत खळबळ! महादेव मुंडे यांच्या मुलाला रस्त्यात अडवून मारहाण, मोठ्या षडयंत्राचा संशय

शरद पवार यांची रक्त तपासणी तसेच सिटी स्कॅन करण्यात आले असून सर्व वैद्यकीय अहवाल नॉर्मल असल्याची प्राथमिक माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. पुढील दोन दिवस ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, सुप्रिया सुळे या सध्या शरद पवार यांच्यासोबत रुग्णालयात उपस्थित आहेत. दुपारी साडेबारा वाजता डॉक्टरांचे विशेष पथक शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत हेल्थ अपडेट देणार आहे.

सुप्रिया सुळे यांनी ‘X’ वर पोस्ट करत शरद पवार यांच्या उपचारात सहभागी असलेल्या सर्व डॉक्टरांचे आभारही मानले आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या प्रकृतीबाबत पुढील माहिती डॉक्टरांच्या अधिकृत निवेदनानंतर स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा: Delhi Police Action: दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; ISI चा ‘टेरर प्लॅन’ उधळला, तामिळनाडू-बंगालमधून आठ दहशतवाद्यांना ठोकल्या बेड्या

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number