Sharad Pawar : अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान; शरद पवारांच्या राज्य सरकारकडे ‘या’ मागण्या

ज्येष्ठ नेते शरद पवारांनी राज्यातील काही जिल्ह्यात झालेल्या पूरपरिस्थितीचा आढावा घेतले. यायोबतच, शरद पवारांनी राज्य सरकारकडे पाच महत्त्वाच्या मागण्या केले. 

Sharad Pawar : अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान; शरद पवारांच्या राज्य सरकारकडे ‘या’ मागण्या

मुंबई: राज्यातील अनेक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे, शेतकरी उदास झाल्याचे पाहायला मिळत आहे. 23 सप्टेंबर रोजी, मदत आणि पुनर्वसन विभागाकडून पूरबाधीत शेतकऱ्यांसाठी शासन निर्णय जारी करण्यात आले. 31 लाख 64 हजार शेतकऱ्यांसाठी 2 हजार 215 कोटी रुपयांची मदत मंजूर झाली.  

तसेच, 24 सप्टेंबर रोजी, पुरग्रस्त गावांची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे दौऱ्यावर होते. ‘मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करत मदत दिली जाईल’, असे आश्वासनही राज्य सरकारतर्फे देण्यात आले. अशातच, एक मोठी बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवारांनी राज्यातील काही जिल्ह्यात झालेल्या पूरपरिस्थितीचा आढावा घेतले. यायोबतच, शरद पवारांनी राज्य सरकारकडे पाच महत्त्वाच्या मागण्या केले. 

हेही वाचा: AJIT PAWAR ON SHARAD PAWAR : अजितदादांनी केलं शरद पवारांचं तोंडभरून कौतुक; म्हणाले, ‘त्यांच्या कामाला…’

शरद पवार काय म्हणाले?

‘राज्यातील अनेक भागांत अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि सामान्य नागरिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था अक्षरश: कोलमडून पडली आहे. शहरी भागांनाही याची झळ पोहोचली आहे. ह्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आपत्ती निवारणाची काही महत्त्वपुर्ण कामे तातडीने हाती घ्यावीत, असे मी सुचवू इच्छितो. 

1 – पंचनामा प्रक्रीयेसाठी ठरावीक मुदतीचे बंधन नसावे: अभुतपूर्व आपत्तीमध्ये पंचनामे वेळेत उरकणे अशक्य आहे. पंचनाम्यांच्या आधारे नुकसानीचा अहवाल राज्यशासनास सादर केल्यानंतर नव्याने निदर्शनास आलेल्या नुकसानाची दखल घेतली जात नाही. उदा. अतीवृष्टीनंतर काही दिवसांनी ऊन पडल्यामुळे भिंती-छप्परांना भेगा जाऊन घरे व इतर वास्तू यांची पडझड होते. पाणी ओसरल्यानंतर पिके व पशूधन व इतर बाबींची हानी निदर्शनास येते. अशा नुकसानीचे देखील पंचनामे होऊन आपदग्रस्तांना नुकसान भरपाई मिळावी.

2 – नुकसान भरपाई सोबत पुनरुज्जीवन कार्यक्रमाचा आराखडा तयार करणे: वस्तुत: आपदग्रस्तांना दिली जाणारी मदत ही नुकसान भरपाई नसून अंशत: दिलासा असतो. शेतकरी आणि सामान्य जनता आपत्तीने कोलमडून गेली असल्याने ह्या नुकसान भरपाई सोबतच पुनरूज्जीवन कार्यक्रमाचा आराखडा तयार करण्यात यावा. ह्यात पिकांच्या पुनर्पेरणी आणि पुनर्लागवडीसाठी विशेष मदत, फळबागांच्या पुनरूज्जीवनासाठी विशेष मदत यांचा समावेश असावा. 

वाहून गेलेली किंवा नापीक झालेली जमीन सुधारण्यासाठी विशेष आराखडा तयार करावा. लहान-मोठे बंधारे, सिंचन कालवे, विहिरी, पंपिंग यंत्रणा आणि इतर सिंचन साधनांची दुरुस्ती आणि गाळ काढण्याची तसेच शेतकऱ्यांच्या बांध-बंदिस्तीची कामे हाती घ्यावीत. पुनर्बांधणी आणि पुनरूज्जीवनाची कामे मनरेगा कामांतून कशी होतील, आपदग्रस्तांच्या हातांना काम कसे मिळेल याचे देखील नियोजन करावे. 

शाळा, आरोग्य, वीज, रस्ते व इतर पायाभूत सुविधांच्या पुनरूज्जीवनाचा आराखडा तयार करावा. पाऊस कमी झाल्यावर व पूर ओसरल्यानंतर ह्या आराखडयाची अंमलबजावणी तातडीने कशी होईल याकडे लक्ष द्यावे. 

3 – साहित्य वाटपाचा कार्यक्रम हाती घ्यावा: अतीवृष्टी आणि पूराने नागरीकांचे संसारपयोगी साहित्य (भांडी, कपडालत्ता, फर्निचर वगैरे) नष्ट झाले आहे. शालेय साहित्य, चारा व शेतीची साधने, व्यवसायिक साहित्य यांची नासधूस झाली आहे. ह्या जंगम वस्तूंचा देखील पुरवठा करण्याचे नियोजन करावे व त्या वेळेत पुरवण्यात यावे.

4 – शेतकरी हिताचे निर्णय: पीक विमा योजनेतील पात्रतेचे निकष शिथील करावेत, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना विमा लाभ मिळेल. खाजगी विमा कंपन्यांकडून टाळाटाळ व दिरंगाई होणार नाही, याकडे सरकारने लक्ष द्यावे.

वित्तीय संस्थांकडून कर्जदार शेतकरी व व्यवसायिक यांच्याकडून होणारी वसूली तात्काळ तहकूब करावी आणि शेतकरी व व्यवसायिक यांना दिलासा देण्यासाठी संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी.

5 – मानसिक आणि सामाजिक आधार: आपत्तीग्रस्तांना मानसिक धक्क्यातून सावरण्यासाठी समुपदेशन शिबिरे आयोजित करावीत. बाधीत व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत टोकाचे पाऊल उचलणार नाहीत, याकडे सत्वर लक्ष द्यावे. 

ह्या अभुतपूर्व संकटात शासकीय यंत्रणा झोकून देऊन काम करत आहे, जनतेने धीराने घ्यावे. यापूर्वीही अशा संकटांतून मार्ग काढून आपण उभे राहिलो आहोत. तसे यावेळी ही पुन्हा उभे राहू, याचा मला विश्वास आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number