यूपीएससी 2024 निकाल जाहीर: प्रयागराजच्या शक्ती दुबेचा अखिल भारतीय (AIR) पहिला क्रमांक

UPSC 2024 परीक्षेत प्रयागराजच्या शक्ती दुबे हिला देशात पहिला क्रमांक, हर्षिता गोयल दुसऱ्या स्थानी; एकूण 1009 उमेदवारांची निवड.

यूपीएससी 2024 निकाल जाहीर: प्रयागराजच्या शक्ती दुबेचा अखिल भारतीय (AIR) पहिला क्रमांक

उत्तरप्रदेश: यूपीएससी नागरी सेवा परीक्षा 2024 चा निकाल अखेर जाहीर झाला असून, देशभरातून तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांमध्ये उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथील शक्ती दुबे हिने बाजी मारली आहे. अखिल भारतीय पहिल्या क्रमांकावर (AIR 1) विराजमान होत तिने आपले स्वप्न सत्यात उतरवले आहे. तिच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर हर्षिता गोयल हिने यश मिळवले आहे. यंदा एकूण 1,009 उमेदवारांची निवड करण्यात आली असून, त्यांची शिफारस IAS, IFS, IPS आणि इतर केंद्रीय गट अ व ब सेवांसाठी करण्यात आली आहे.

शक्ती दुबेचा शैक्षणिक प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. तिने युनिव्हर्सिटी ऑफ अलाहाबाद येथून बायोकॅमिस्ट्रीमध्ये बीएससी पूर्ण केली आणि त्यानंतर काशी हिंदू विद्यापीठ (BHU), वाराणसी येथून एमएससी पदवी प्राप्त केली. काही काळ ती शिक्षिकेच्या भूमिकेत होती, मात्र तिच्या मनात UPSC साठीची इच्छा प्रबळ होती. 2018 पासून UPSC परीक्षेची सखोल तयारी करत असताना तिने राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध (PSIR) हा वैकल्पिक विषय निवडला आणि त्या विषयात खोलवर अभ्यास केला. तिच्या यशामागे सातत्य, चिकाटी आणि अभ्यास आहे.

वैजापूर स्फोट प्रकरणाचा उलगडा; बँक लुटीचा प्रयन्त दाखवून पुरावे नष्ट करण्याचा डाव

2024 मध्ये पार पडलेली ही परीक्षा नेहमीप्रमाणे तीन टप्प्यांत झाली. पूर्वपरीक्षा 16 जून रोजी, मुख्य परीक्षा 20 ते 29 सप्टेंबर दरम्यान आणि व्यक्तिमत्व चाचणी 7 जानेवारी ते 17 एप्रिल 2025 दरम्यान घेण्यात आली. या सर्व टप्प्यांच्या गुणांच्या आधारे अंतिम यादी तयार करण्यात आली आहे.

यंदाच्या UPSC परीक्षेमध्ये विविध सेवांमध्ये भरतीसाठी जागा पुढीलप्रमाणे आहेत . IAS साठी 180 जागा, ज्यात सामान्य प्रवर्गासाठी 73, EWS:18, OBC :52, SC :24, ST:13 जागा आहेत. IFS साठी 55 जागा, IPS साठी 147 जागा, तर केंद्रीय गट ‘अ’ सेवांसाठी 605 आणि गट ‘ब’ साठी 142 जागा उपलब्ध आहेत.

या निकालामुळे UPSC च्या तयारीत गुंतलेल्या हजारो विद्यार्थ्यांसाठी नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. शक्ती दुबेचं यश फक्त तिचं वैयक्तिक यश नाही, तर हे एक प्रेरणास्त्रोत आहे; शिकण्याची तळमळ, सातत्य आणि योग्य दिशेने केलेली मेहनत कशी फळ देते, याचं हे उत्तम उदाहरण म्हणता येईल. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number