अरुणाचल प्रदेश येथील कामेंग सेक्टरमध्ये मंगळवारी भीषण दुर्घटना घडली होती. येथे झालेल्या हिमस्खलनात सात जवानांचा मृत्यू झाला आहे.
अरुणाचल येथील हिमस्खलनात सात जवान अडकल्याची माहिती मिळाल्यामुळे युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले होते. मात्र, बचावकार्य निष्फळ ठरले आहे. तर या घटनेमध्ये सात जवानांनी आपला जीव गमावला आहे.
अरुणाचल प्रदेश येथील कामेंग भागात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. ही बर्फवृष्टी भारतीय लष्करांसाठी मोठे आव्हान असते. मात्र, सोमवारी घडलेल्या घटनेमध्ये भारताचे सात जवान या बर्फवृष्टीमध्ये अडकले होते. त्यामुळे युद्धपातळीवर बचावकार्यासाठी विशेष विमानाने कुमक पाठवण्यात आले, मात्र बचावकार्य निष्फळ ठरले आहे.