Sachin Ahir: उद्धव ठाकरेंना वरळीत धक्का, शिंदेंचा मोठा गेम; ‘या’ कायदेशीर पळवाटेमुळे सचिन अहिर सुरक्षित

विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील विजयाचे मुख्य सूत्रधार राहिलेले सचिन अहिर आता शिंदे गटात सामील झाले आहेत.

Sachin Ahir: उद्धव ठाकरेंना वरळीत धक्का, शिंदेंचा मोठा गेम; ‘या’ कायदेशीर पळवाटेमुळे सचिन अहिर सुरक्षित

Sachin Ahir: शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे हे 'ऑपरेशन टायगर'च्या माध्यमातून महाराष्ट्रभर फिरून एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या नेत्यांवर जोरदार टीका करत आहेत. मात्र, याच काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट मुंबईतील ठाकरेंच्या बालेकिल्ल्याला मोठा हादरा दिला आहे. विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील विजयाचे मुख्य सूत्रधार राहिलेले सचिन अहिर आता शिंदे गटात सामील झाले आहेत. अहिर यांनी मंगळवारी थेट शिंदे गटाकडून विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राज्यातील राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

ठाकरे गटाचे संख्याबळ घटले 
या मोठ्या राजकीय घडामोडीपूर्वी विधान परिषदेत ठाकरे गटाकडे एकूण 6 आमदार होते. परंतु, सचिन अहिर यांनी बाजू बदलल्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्याकडे केवळ 5 आमदार शिल्लक राहिले आहेत. अहिर यांनी एकट्यानेच पक्षांतर केल्यामुळे त्यांच्यावर पक्षांतरबंदी कायद्यानुसार कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, मुख्यमंत्र्यांनी कायदेशीर बाबींचा सखोल अभ्यास करूनच ही खेळी खेळल्याचे स्पष्ट झाले आहे. अहिर हे जरी एकटेच बाहेर पडले असले, तरी त्यांच्यावर अपात्रतेची कोणतीही कारवाई होऊ शकत नाही.

'हा' कायदेशीर नियम बनला सचिन अहिरांचे कवच
पक्षांतरबंदी कायद्याच्या 10 व्या अनुसूचीमध्ये एकूण 8 परिच्छेद आहेत, ज्यामध्ये अपात्रतेचे नियम आणि त्यातील सवलती स्पष्ट केल्या आहेत. यातील 'परिच्छेद 5' हा सचिन अहिर यांच्यासाठी कायदेशीर कवच ठरला आहे. या नियमानुसार, जर एखादा लोकप्रतिनिधी लोकसभा अध्यक्ष-उपाध्यक्ष, राज्यसभा उपसभापती, किंवा राज्यांच्या विधानसभा आणि विधान परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष अथवा सभापती-उपसभापती पदावर नियुक्त होत असेल, तर त्याला पक्षांतरबंदी कायद्यातून पूर्णपणे सूट मिळते. याच नियमाचा फायदा अहिर यांना मिळणार आहे.

हेही वाचा – Sanjay Shirsat On Uddhav Thackeray Shivsena : ठाकरेंचे उरलेले 5 आमदारही शिंदेसेनेच्या वाटेवर? शिरसाटांनी केला मोठा गौप्यस्फोट; राजकीय खळबळ

शिवसेना (UBT) विधान परिषदेत शिल्लक राहिलेले 5 आमदार
दरम्यान, सचिन अहिर यांच्या एक्झिटनंतर आता विधान परिषदेत उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी केवळ खालील 5 आमदार उरले आहेत:

अनिल परब  
मिलिंद नार्वेकर  
अंबादास दानवे 
ज. मो. अभ्यंकर 
सुनील शिंदे
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number