भाजपच्या दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष मंगेश दळवी यांच्यासह चार जणांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील कुरमुली येथील फार्म हाऊस येथील वादानंतर मंगेश दळवी यांच्यावर पेण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष मंगेश दळवी, हरेश दळवी, रुपेश दळवी, रंजित दळवी अशी अरोपींची नाव समोर आली आहेत. मयुर वनगे याने या प्रकरणी पेण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्या तक्रारी नुसार आरोपी यांनी फिर्यादी यांच्या फार्म हाऊसवर येऊन तलवार, लाकडी दांडके, रॉडने मारहाण केली, रिव्हॉल्व्हरचा वापर करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याची माहिती समोर आली आहे.
आरोपी यांनी फिर्यादी यांचे अंशी हजार रुपये आणि पाच तोळ्याची सोन्याची चेन काढुन घेतल्याचा देखील तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे. गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्याने भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश दळवी अडचणीत वाढ झाल्याचे समोर आले आहे.