कोल्हापूर प्रकरणावरून शरद पवारांचे गंभीर आरोप

औरंगाबादमध्ये संदलच्या मिरवणुकीत औरंगजेबाचा फोटो घेऊन एक व्यक्ती नाचत असल्याचं समोर आल्यानंतर त्याच्या राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. मात्र, पोलिसांच्या सावधानतेमुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. परंतु, या प्रकारावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपल्या देशात आणि राज्यात अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. अशात इतर प्रश्न उगाच समोर आणले जात आहेत. मर्यादित भागात […]

कोल्हापूर प्रकरणावरून शरद पवारांचे गंभीर आरोप

औरंगाबादमध्ये संदलच्या मिरवणुकीत औरंगजेबाचा फोटो घेऊन एक व्यक्ती नाचत असल्याचं समोर आल्यानंतर त्याच्या राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. मात्र, पोलिसांच्या सावधानतेमुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. परंतु, या प्रकारावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपल्या देशात आणि राज्यात अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. अशात इतर प्रश्न उगाच समोर आणले जात आहेत. मर्यादित भागात तणाव झाला असेल तर चांगली गोष्ट आहे. मी ते म्हणत नाही. पण हे घडत नाही. औरंगाबादमध्ये औरंगजेबाचे फोटो दाखवल्यानंतर पुण्यात आणि कोल्हापुरात दंगल करण्याचे कारण काय? असा सवाल करतानाच फोटो दाखवला तर काय परिणाम होतो? अशा शब्दात शरद पवार यांनी फोटो झळकवणाऱ्यांचे कान टोचले. शरद पवार हे संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

कुणी तरी मोबाईलवर मेसेज पाठवला. चुकीचा असेल, नाही असे नाही. पण त्यासाठी लगेच रस्त्यावर उतरून त्याला धार्मिक स्वरुप देणं योग्य नाही. सत्ताधारी वर्ग अशा गोष्टीला प्रोत्साहित करतो. लव्ह जिहादसारख्या नाही त्या प्रश्नांना फाजील प्रश्नांना महत्त्व दिले जात आहे. कारण नसताना समाजा-समाजात तेढ वाढवतो. या सगळ्या गोष्टींसंबंधी मीडियानेही फार प्रसिद्धी देऊ नये. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखने हे राज्यकर्त्यांचं कर्तव्य आहे. पण राज्यकर्तेच रस्त्यावर उतरायला लागले, त्यांचे सहकारी उतरायला लागले तर दोन समाजात जातीय कटुता निर्माण होत आहे. ते योग्य नाही, असे मत पवार यांनी व्यक्त केले.

दिल्ली येथील कुस्तीगिरांच्या आंदोलनावरही त्यांनी यावेळी भाष्य केले. आम्ही लोकांनी कुस्तीपटूंना पाठिंबा दिला आहे. अनेकांनी पाठिंबा दिला आहे. बृजभूषण सिंह शरण हे सत्ताधारी पक्षाचे खासदार आहेत. त्यांच्याविरोधात सरकार किती खोलात आहे हे पाहावे लागेल. त्यांची चौकशी सुरू झाली आहे. मात्र, कुस्तीगिरांचे म्हणणे आहे की त्यांना अटक करा. पण निदान चौकशी सुरू केली आहे, असेही पवार म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number