Stock Market Today: शेअर बाजारात सलग होणाऱ्या तेजीला ब्रेक, सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात, ‘या’ बड्या शेअर्सनी गुंतवणूदारांना रडवलं

आयटी क्षेत्रातील कमकुवत निकाल, HCL Tech च्या शेअर्समधील घसरण आणि मिडल ईस्टमधील तणावामुळे सेन्सेक्स व निफ्टीवर दबाव दिसून आला.

Stock Market Today: शेअर बाजारात सलग होणाऱ्या तेजीला ब्रेक, सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात, ‘या’ बड्या शेअर्सनी गुंतवणूदारांना रडवलं

मुंबई: भारतीय शेअर बाजारात आठवड्याच्या तिसऱ्या व्यवहारदिनी म्हणजेच बुधवारी, 22 एप्रिल 2026 रोजी सुरुवात नकारात्मक झाली. सलग तीन दिवसांच्या तेजी नंतर गुंतवणूकदारांनी नफा वसुलीला प्राधान्य दिल्याने बाजारावर दबाव दिसून आला. याशिवाय आयटी क्षेत्रातील कमकुवत निकाल आणि मिडल ईस्टमधील तणावामुळे बाजारात घसरण झाली.

बीएसई सेन्सेक्स 253.99 अंकांनी किंवा 0.32 टक्क्यांनी घसरून 79,019.34 वर उघडला. तर एनएसई निफ्टी 50 105.75 अंकांनी किंवा 0.43 टक्क्यांनी घसरून 24,470.85 वर सुरू झाला. सकाळी सुमारे 9 वाजून 20 मिनिटांपर्यंत सेन्सेक्स 365 अंकांच्या घसरणीसह 78,907 वर व्यवहार करत होता, तर निफ्टी 90 अंकांनी खाली येत 24,485 वर पोहोचला होता.

बीएसई मधील टॉप गेनर्समध्ये ट्रेंट, बजाज फायनान्स, मारुती सुझुकी, इटर्नल आणि आयटीसी यांचा समावेश होता. तर टॉप लूजर्समध्ये एचसीएल टेक, टेक महिंद्रा, इन्फोसिस, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि आयसीआयसीआय बँक हे शेअर्स होते. एचसीएल टेकच्या कमकुवत निकालांमुळे आयटी निर्देशांकात 2 टक्क्यांहून अधिक घसरण झाली.

हेही वाचा: Maharashtra Weather Update: सावधान! पुढील 48 तास महत्त्वाचे; मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

मंगळवारी मात्र बाजारात जोरदार तेजी दिसून आली होती. सेन्सेक्स 753.03 अंकांच्या वाढीसह 79,273.33 वर बंद झाला होता, तर निफ्टी 211.75 अंकांनी वधारून 24,576.60 वर स्थिरावला होता. वित्तीय, एफएमसीजी आणि बँकिंग क्षेत्रातील खरेदीमुळे बाजाराला आधार मिळाला होता.

विश्लेषकांच्या मते, अमेरिका-इराण चर्चेबाबतची अनिश्चितता, कच्च्या तेलाच्या किमती आणि जागतिक बाजारातील कमकुवत संकेत यामुळे पुढील काही दिवस बाजारात अस्थिरता कायम राहू शकते. गिफ्ट निफ्टीमध्येही घसरण दिसून आल्याने दलाल स्ट्रीटवर दबाव कायम राहण्याची शक्यता आहे. 

(Disclaimer: शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची आहे. नियम व अटी काळजीपूर्वक वाचा. जय महाराष्ट्र न्यूज कोणत्याही नफ्या-तोट्यास जबाबदार नाही. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या!)

हेही वाचा: BEST New Buses: मुंबईकरांचा प्रवास सुखाचा होणार; ताफ्यात 500 नव्या बेस्ट बसेस, प्रशासनाची मोठी घोषणा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number