जेष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे निधन

सुप्रसिध्द वृत्तनिवेदक आणि सूत्रसंचालक प्रदीप भिडे यांचे आज निधन झाले. गेल्या ४२ वर्षांहून अधिक काळ त्यांनी सातच्या बातम्यांमधून प्रेक्षकांना राज्य-राष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडी सांगितल्या, ज्यांच्या भारदस्त आणि संवेदनशील आवाजातून बातमीची धग समजली, त्या सुप्रसिद्ध वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं निधन झालं आहे. वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दूरदर्शनमध्ये जवळपास ४२ वर्ष त्यांनी वृत्तनिवेदन केलं. […]

जेष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे निधन

सुप्रसिध्द वृत्तनिवेदक आणि सूत्रसंचालक प्रदीप भिडे यांचे आज निधन झाले. गेल्या ४२ वर्षांहून अधिक काळ त्यांनी सातच्या बातम्यांमधून प्रेक्षकांना राज्य-राष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडी सांगितल्या, ज्यांच्या भारदस्त आणि संवेदनशील आवाजातून बातमीची धग समजली, त्या सुप्रसिद्ध वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं निधन झालं आहे. वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दूरदर्शनमध्ये जवळपास ४२ वर्ष त्यांनी वृत्तनिवेदन केलं. भिडे यांनी राज्य आणि देशातील अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडींवेळी केलेलं वृत्तनिवेदन आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे.

नमस्कार मी प्रदीप भिडे…असं म्हणत त्यांनी भारदस्त आणि संवेदनशील आवाजातून बातमी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. वयाच्या २१ व्या वर्षी भिडे यांनी पत्रकार म्हणून काम करायला सुरूवात केली. दूरदर्शनच्या वृत्तविभागामधे अनुवादक म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली. सुरुवातीपासूनच मराठी वाड्मय, नाटके, कादंब-या, एकांकिका या विषयांमधे त्यांना विशेष रुची होती. प्रसार माध्यमात करिअर सुरू करावं असा पहिल्यापासूनच त्यांचा मानस होता.

प्रदीप भिडे यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाले. पदवीनंतर त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमध्ये पत्रकारितेचे शिक्षण घेतले. त्यांनी बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये ‘जनसंपर्क अधिकारी’ पदावर काम केले. पुढं १९७४ मध्ये त्यांनी मुंबई दूरदर्शन केंद्रामध्ये नोकरीला सुरुवात केली. मुंबईत त्यांनी ‘प्रदीप भिडे कम्युनिकेशन’ या नावाने ध्वनिमुद्रण स्टुडिओ निर्मिती संस्था सुरू केली. पुढे त्यांनी या क्षेत्रात जम बसवला आणि स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण करून जाहिराती माहितीपट आणि लघुपट यावर आपला आवाज ठसविला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number