भारतीय वायुदलात तीन राफेल विमानांची दुसरी तुकडी

भारतीय वायुदलात बुधवारी संध्याकाळी आणखी तीन राफेल विमानांची दुसरी तुकडी भारतात दाखल झाली आहे. यापूर्वी पंजाबमधे अंबाला येथे पहिली पाच राफेल विमान दाखल झाली होती.भारताने फ्रान्सकडून 59 हजार कोटींचा करार करून 36 राफेल लढाऊ विमानं खरेदी केली आहेत. The second batch of three Rafale aircraft got airborne from Istres airbase in France and flew for […]

भारतीय वायुदलात तीन राफेल विमानांची दुसरी तुकडी

भारतीय वायुदलात बुधवारी संध्याकाळी आणखी तीन राफेल विमानांची दुसरी तुकडी भारतात दाखल झाली आहे. यापूर्वी पंजाबमधे अंबाला येथे पहिली पाच राफेल विमान दाखल झाली होती.
भारताने फ्रान्सकडून 59 हजार कोटींचा करार करून 36 राफेल लढाऊ विमानं खरेदी केली आहेत.


आतापर्यंत आठ विमान भारतात दाखल झाली आहेत. भारतीय वायुदलाने दिलेल्या माहितीनुसार गुजरातमधील जामनगर एअरबेसवर ही विमान उतरली आहेत. ही विमान फ्रान्समधून उडाण घेतल्यानंतर एकही थांबा न घेता भारतात आली आहेत. प्रवासादरम्यान फ्रान्सच्या आणि भारताच्या विमानाद्वारे यात इंधन भरण्यात आले. उरलेली 28 राफेल लढाऊ विमानं टप्प्याटप्प्याने भारतात येणार आहेत. प्रत्येक दोन ते तीन महिन्यानंतर तीन ते चार राफेल विमानं दिली जाणार आहेत.


1997 मध्ये भारतीय हवाई दलात रशियाच्या सुखोई-30 ही विमान घेण्यात आली होती त्यानंतर 23 वर्षांनी राफेल लढाऊ विमानं खरेदी करण्यात आली आहेत. राफेल विमानांमुळे भारतीय वायुदल अधिक शक्तिशाली आणि बलवान होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number