मुंबईतील पहिली ते नववीच्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद

राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबई महापालिकेने शाळांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील पहिली ते नववीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे येत्या ३१ जानेवारीपर्यंत मुंबईतील पहिली ते नववीपर्यंतच्या शाळा बंद असणार आहेत. मात्र या कालावधीमध्ये पहिली ते नववीपर्यंतचे वर्ग ऑनलाईन सुरू राहणार आहेत. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. सर्वाधिक […]

मुंबईतील पहिली ते नववीच्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद

राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबई महापालिकेने शाळांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील पहिली ते नववीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे येत्या ३१ जानेवारीपर्यंत मुंबईतील पहिली ते नववीपर्यंतच्या शाळा बंद असणार आहेत. मात्र या कालावधीमध्ये पहिली ते नववीपर्यंतचे वर्ग ऑनलाईन सुरू राहणार आहेत.

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. तर राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मुंबईमध्ये कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने पहिली ते नववीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र विद्यार्थ्यांचे पहिले ते नववीपर्यंतेच वर्ग ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत.

१५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण

राज्यात आजपासून १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू झाले आहे. राज्यात ठिकठिकाणी मुलांच्या लसीकरणाचे केंद्र उभारली आहेत. मुंबईत एकूण ९ ठिकाणी लसीकरण केंद्रे उभारली आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वांद्रे-कुर्ला संकुल कोविड लसीकरण केंद्रात शुभारंभ झाला. पालकांनी आपल्या पाल्याची नोंदणी करून लसीकरण करून घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number