पुणे जिल्ह्याच्या पिंपरी चिंचवडमधील सायली सुर्वे हिचं, शुद्धीकरण करून तिला पुन्हा हिंदू धर्मात समाविष्ट करून घेण्यात आलं आहे. पिंपरी चिंचवड मधील रहिवासी असलेल्या सायलीन 2019 मध्ये मीरा भाईंदर शहरातील प्रसिद्ध उद्योजक आतिफ तासे सोबत घरच्यांचा विरोध झुगारून लग्न केलं होतं.
मात्र आतिफ तासे शी लग्न करणे आपली चूक होती, लग्न झाल्यानंतर सतत आपला छळ केल्या गेला आणि आपलं धर्मांतरण देखील केला गेल्याचा आरोप सायलीने केला. याबाबत अनेकवेळा आपण पोलिसांकडे तक्रार केली होती मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचं देखील सायलीने स्पष्ट केलं.
अनेक प्रयत्न केल्यानंतर आपण हिंदुत्वादी संघटनांच्या संपर्कात आलो आणि आता त्यांच्या मार्फतच आपल्याला हिंदुधर्मात प्रवेश दिला गेल्याच देखील सायलीने म्हटलं आहे. सायलीला परत हिंदू धर्मात घेण्यासाठी अशा पद्धतीने होम हवन मंत्रोच्चार करण्याची प्रक्रिया राबविल्या गेल्या. याशिवाय, सायली सुर्वेच लग्नानंतर अतेझा तासे असं नामकरण करण्यात आलं होतं ते नाव बदलून शुद्धीकरण प्रक्रियेत पुन्हा तिचं नामकरण करत तिला अद्या सुर्वे हे नावं देण्यात आलं आहे.