Maratahi Sahitya Sammelan: साताऱ्यातील साहित्य संमेलनाला गालबोट; संमेलन कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न

साताऱ्यातील 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे.

Maratahi Sahitya Sammelan: साताऱ्यातील साहित्य संमेलनाला गालबोट; संमेलन कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न

सातारा: साताऱ्यातील शाहू स्टेडियमवर 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच, एक धक्कादायक घटना समोर आली आहे. संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर संमेलन स्थळीच हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. साहित्याच्या या महाकुंभाला गालबोट लावणाऱ्या या घटनेमुळे सातारा शहरासह संपूर्ण साहित्य विश्वात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विनोद कुलकर्णी संमेलनाच्या नियोजनात व्यस्त असताना हा प्रकार घडला. मराठी साहित्य महामंडळाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णींवर अज्ञातांनी काळा बुक्का टाकून हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. हल्लेखोर कोण होता आणि या हल्ल्यामागचा नेमका हेतू काय होता, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर संमेलन परिसरातील सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे आज संमेलनस्थळी उपमुख्यमंत्री अजित पवार भेट देणार असल्याची माहिती जय महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी प्रकाश शिंदे यांनी दिली आहे आणि त्याअगोदरच ही घटना घडली आहे. संमेलनाच्या कडक सुरक्षा व्यवस्थेत हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

हेही वाचा: Drunk Man Viral Video: निजामाबादचा ‘तिरुपती’ तिरुपतीतच चढला कळसावर! अजब मद्यपीचा ‘गजब’ पराक्रम; सुरक्षा यंत्रणेला फुटला घाम

काही आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील चौकशी झाल्यावर हल्ल्याचे नेमके कारण समोर येईल. 

 

संमेलन व्यवस्थित पार पडावे म्हणून नगराध्यक्ष अमोल मोहिते आणि त्यांची टीम या संमेलनासाठी मेहनत घेत आहे. शहरात उत्साहाचे वातावरण असताना कार्याध्यक्षांवरील या हल्ल्याच्या प्रयत्नामुळे सातारकर आणि साहित्यिक चिंतेत आहेत. संमेलन निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी स्थानिक प्रशासनाने आता अधिक खबरदारी घेण्याचे ठरवले आहे.

हेही वाचा: Saudi Arabia Airstrike in Yemen : सौदी अरेबियाचा येमेनवर भीषण हवाई हल्ला; 20 ठार, यूएईसोबतचा तणाव शिगेला

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number