Jawan Dies In Accident: हे वाचून कोणाच्याही काळजाचे पाणी होईल; इकडे लेकीचा जन्म, तिकडे शूरवीर पित्याचा अंत, काय घडलं?

'बाबा' म्हणून ज्यांच्या कुशीत शिरायचे होते, त्यांच्याच चितेवर माथा टेकवण्याची वेळ त्या नवजात बालिकेवर आली आहे.

Jawan Dies In Accident: हे वाचून कोणाच्याही काळजाचे पाणी होईल; इकडे लेकीचा जन्म, तिकडे शूरवीर पित्याचा अंत, काय घडलं?

सातारा: ज्या हातांनी देशाच्या सीमांचे रक्षण केले, ज्या डोळ्यांनी आपल्या होणाऱ्या बाळाचे स्वप्न पाहिले, त्याच डोळ्यांवर काळाने झडप घातली. सातारा तालुक्यातील दरे गावचे सुपुत्र आणि भारतीय सैन्य दलाचे जवान प्रमोद परशुराम जाधव यांचा अपघाती मृत्यू झाला. ही केवळ एक बातमी नाही, तर एका कुटुंबावर कोसळलेला दुःखाचा डोंगर आहे. नियती किती क्रूर असू शकते, याचा प्रत्यय या घटनेने साताऱ्यासह संपूर्ण महाराष्ट्राला आला आहे.

काही वर्षांपूर्वी आईचे छत्र हरवलेल्या प्रमोद यांनी संसाराचा गाडा मोठ्या जिद्दीने ओढला होता. पत्नीच्या प्रसूतीसाठी, त्या खास क्षणी कुटुंबासोबत राहण्यासाठी ते आठ दिवसांपूर्वीच सिकंदराबाद (श्रीनगर) येथून सुट्टी घेऊन आनंदाने गावी आले होते. पण शनिवारी वाढे फाट्याकडे जात असताना एका टेम्पोने त्यांच्या दुचाकीला धडक दिली आणि या भीषण अपघातात प्रमोद यांनी जागीच प्राण गमावला. प्रमोद यांना एका बाजूला नव्या पाहुण्याच्या आगमनाची ओढ असतानाच, दुसऱ्या बाजूला काळाने घाला घातला.

हेही वाचा: Viral Crime Video: थरकाप उडवणारा व्हिडिओ; भाजप मंत्र्याच्या 'खास' माणसाकडून दगडाने ठेचून मारहाण; अंबादास दानवेंनी केला पर्दाफाश

सर्वात हृदयद्रावक बाब म्हणजे, ज्या दिवशी प्रमोद यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी दरे येथे आणण्यात आले, त्याच सुमारास त्यांच्या पत्नीने एका गोंडस बालिकेला जन्म दिला. ज्या घरात पाळणा हालणार होता, तिथे वडिलांचा तिरंग्यात गुंडाळलेली देह (पार्थिव) पाहून काळजाचा ठोका चुकला. ज्या चिमुकलीने अजून पूर्णपणे डोळेही उघडले नव्हते, तिला आपल्या वडिलांचे अंत्यदर्शन घ्यावे लागले. पित्याचं छत्र हरवलेल्या त्या चिमुकलीला पाहताना उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या.

'बाबा' म्हणून ज्यांच्या कुशीत शिरायचे होते, त्यांच्याच चितेवर माथा टेकवण्याची वेळ त्या नवजात बालिकेवर आली. अंत्यविधीच्या वेळी जेव्हा पत्नी आणि त्या काही तासांच्या बाळाला प्रमोद यांच्या जवळ नेण्यात आले, तेव्हा संपूर्ण दरे गाव हुंदक्यांनी भरून गेले होते. शासकीय इतमामात, पोलीस दलाच्या मानवंदनेत प्रमोद यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, मात्र या वीरपुत्राच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न येणारी आहे.

प्रमोद जाधव यांच्या पश्चात त्यांचे वृद्ध वडील, पत्नी आणि नुकतीच जन्मलेली लहान मुलगी असा परिवार आहे. देशाचे रक्षण करणाऱ्या या शूर जवानाला नियतीने मात्र साथ दिली नाही. एका सैनिकाचे बलिदान आणि एका पित्याची अपूर्ण राहिलेली इच्छा पाहून आज अवघा सातारा जिल्हा हळहळत आहे. वीर जवान प्रमोद जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

हेही वाचा: IND Vs NZ Cricket Match: दुखापतीचे ग्रहण संपेना; न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा झटका

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number