Sanjay Shirsat On NCP : "राष्ट्रवादीतील काही लोक आमच्या संपर्कात" शिरसाटांचा मोठा गौप्यस्फोट, नेते फुटणार?

सकाळी छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी मोठा दावा केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिवसेंदिवस मोठ्या राजकीय हालचालींना वेग आला आहे.

Sanjay Shirsat On NCP : &quotराष्ट्रवादीतील काही लोक आमच्या संपर्कात&quot शिरसाटांचा मोठा गौप्यस्फोट, नेते फुटणार?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिवसेंदिवस मोठ्या राजकीय हालचालींना वेग आल्याची चर्चा रंगू लागली आहे. मागच्याच आठवड्यात सुनील तटकरे आणि प्रफुल पटेलांनी सिल्वर ओक या निवासस्थानी जाऊन शरद पवारांची अचानक पणे भेट घेतली होती. एकीकडे सुनील तटकरे नाराज असल्याच्या चर्चा सुरु असताना, नुकतीच राष्ट्रवादी अजित पवार गटातील तब्बल 22 आमदारांनी ज्येष्ठ नेते शरद पवारांची गुप्तभेट घेतल्याची माहिती समोर आली होती. या घडामोडींमुळे राज्याच्या सत्तासमीकरणांबाबत नव्या चर्चांना उधाण आले होते. त्यामुळे राष्ट्रवादीत नेमकं काय शिजतंय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा- Vikas Lawande Arrest: “चोर सोडून संन्याशाला फाशी..” राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विकास लवांडे यांना अटक; सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती

अशातच सकाळी छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी मोठा दावा केला आहे. राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेल्या राजकीय हालचालींबाबत संजय शिरसाठ यांनी मोठा दावा केला आहे. “राष्ट्रवादीमध्ये असणारे अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत, कुणाच्या नेतृत्वात काम करायचे याबाबत त्या पक्षात संभ्रम आहे. एवढे मात्र नक्की आहे की, त्या पक्षात सर्व काही अलबेला नाही.” अशी प्रतिक्रिया देत संजय शिरसाठ यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील नेते आमच्या संपर्कात आहेत, तर त्यांच्या पक्षात अलबेल नसल्याचे मोठे वक्तव्य केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number