Sanjay Raut on Thackeray Bandhu : महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि मनसे एकत्र? संजय राऊतांनी अखेर केलं स्पष्ट

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

Sanjay Raut on Thackeray Bandhu : महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि मनसे एकत्र? संजय राऊतांनी अखेर केलं स्पष्ट

मुंबई : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे बिगुल काल वाजले असून 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक महत्त्वाचे खुलासे केले.

संजय राऊत म्हणाले की, ठाकरे बंधूंचे कौटुंबिक संबंध सुधारले आहेत, आता राजकीय युती होणार का याबाबत स्पष्ट इशारा देत त्यांनी सांगितले की ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा-भाईंदर, नाशिक, पुणे या ठिकाणी मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट एकत्र महानगरपालिका निवडणूक लढवणार आहेत. राज्यातील उर्वरित महानगरपालिकांमधील स्थानिक पातळीवरील पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते मिळूनच युतीबाबत निर्णय घेतील, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: Madhuri Elephant : माधुरी हत्तीण नांदणी मठात परतणार! वनताराच्या केंद्रासाठी परवानगी तर आरोग्याबाबत मोठा दिलासा

राऊत पुढे म्हणाले की, “29 महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या लढ्यापेक्षा ही लढाई मुंबईची आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही मुख्य लढाई मुंबईचीच होती. संयुक्त महाराष्ट्रासाठी ज्यांनी बलिदान दिले, त्या बलिदान देणाऱ्यांची जाणीव ठेवून आम्ही निवडणूक लढवणार आहोत. उद्या पुन्हा मुंबईचा मराठीचा प्रश्न मुद्द्यावर आला, तर आम्ही बलिदान द्यायला तयार आहोत, पण मुंबई आम्ही शाहंच्या घशात जाऊ देणार नाही, असा ठाम इशाराही त्यांनी दिला. मुंबई कोणाला लुटायची आहे आणि त्यांना पाठबळ देणारे कोण आहेत, हे महाराष्ट्राला माहित आहे, देशालाही माहित आहे.”

येत्या आठवड्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षांच्या युतीबाबत अधिकृत घोषणा होणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. पक्षप्रमुखांनी मिळून कार्यक्रम ठरवलेला आहे आणि लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. बिहारच्या निवडणुकांनंतर काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे, त्यामुळे ते आमच्यासोबत असतील की नाही हे सांगता येत नाही. मात्र मुंबईसाठी काँग्रेसने आमच्यासोबत निवडणूक लढवली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. आम्ही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली आहे, मात्र त्यांनी ही बाब स्थानिक पातळीवरील नेत्यांवर सोडली आहे, असेही त्यांनी सांगितले.

मराठी माणसाच्या मुद्द्यावर बोलताना राऊत म्हणाले, “आम्ही मराठी माणसाच्या प्रश्नासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी वेळ पडली तर शिव्याही देतो.” परवा अमित शाहांनी संसदेत ‘साला’ शब्द वापरला, तेव्हा संसद कामकाज बंद पाडायला पाहिजे होते. महाराष्ट्राच्या अस्तित्वाच्या मुळावर येणाऱ्यांना जोड्याने मारलं पाहिजे आणि शिव्याही दिल्या पाहिजेत, कारण ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत, असे परखड मत त्यांनी मांडले. शरद पवार यांच्यासंदर्भात पक्ष पाठिंब्याबाबत निर्णय घेण्यासाठी मी त्यांना वैयक्तिक भेटून चर्चा करणार आहे, असेही संजय राऊत यांनी सांगितले. तसेच आज मी राज ठाकरेंना भेटत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: Bombay HC on Mumbai Air : उच्च न्यायालयाला मुंबईकरांची काळजी, म्हणाले, ‘यावर तोडगा…

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number