Sanjay Raut : ठाकरे बंधुंच्या भूमिकेचं संजय राऊतांकडून समर्थन

ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. राज्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा रंगत आहेत. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. 

Sanjay Raut : ठाकरे बंधुंच्या भूमिकेचं संजय राऊतांकडून समर्थन

मुंबई : ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. राज्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा रंगत आहेत. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. 

एक लक्षात घ्या ते ही ठाकरे आहेत, हे ही ठाकरे आहे. काही राजकीय मतभेद झाले पण उद्धव ठाकरे यांचा मार्ग महाराष्ट्र हिताचा आहे. उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे, कोणताही वाद नाही. लोकसभेवेळी विधानसभेवेळी उद्धव ठाकरे हेच सांगत होते. महाराष्ट्राच्या शत्रूंना फायदा होईल अशी भूमिका घेऊ नये
असे राऊत यांनी म्हटले आहे. काही शक्ती महाराष्ट्राला पाण्यात पाहतात. मराठी माणसाचं नुकसान व्हावं असं वागतात, अशा लोकांच्या पंगतीला आम्ही बसणार नाही अशी भूमिका घेणे गरजेचे आहे. जर ही भूमिका कोणी घेत असेल तर स्वागत असल्याचे राऊतांनी राज यांना म्हटले आहे. 

हेही वाचा : आम्ही युतीमध्ये येणार नाही; राज-उद्धव युतीवर संदीप देशपांडेंचे भाष्य

'दोघं एकमेकांशी का नाही बोलणार?' 
खासदार राऊत यांनी महाराष्ट्र संदर्भात सध्याची परिस्थिती गंभीर आहे. याच भूमिकेचा राज ठाकरे यांनी पुरस्कार करणे गरजेचे आहे. काही भाजपवाल्यांना ठाकरे नाव नष्ट करायचे आहे अशा वेळेला दोन्ही ठाकरे बंधूंनी भूमिका घेतली तर चांगलं आहे. या भूमिकेकडे आम्ही सकारात्मक पद्धतीने पाहतो असे म्हटले आहे. तसेच राज ठाकरे भाजपा आणि शिंदेंसोबत दिसत आहेत. राज ठाकरेंचा वापर करून मराठी माणसाला कमजोर करण्याचा प्रयत्न करतात. तर का नाही दोघं एकमेकांशी बोलणार असे राऊत म्हणाले. 

'दोन ठाकरे एकत्र यावे ही लोक भावना'
उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. आम्ही हवेत बोलत नाही. आम्ही वाट पाहू. राज ठाकरे यांनी जर चांगली भूमिका घेतली. तर आम्ही नाकारण्याची भूमिका घेणार नाही. मतभेद का झाले कारण तुम्ही बाळासाहेब यांच्या शत्रूंना एकत्र घेतलं. असे राजना राऊतांनी म्हटले आहे. ईव्हीएमच्या माध्यमातून घोटाळा करून निवडणुकीला जिंकले जाते. दोन ठाकरे एकत्र यावे ही लोक भावना असल्याचे राऊत यांनी सांगितले आहे. 

'रक्ताची नाती आहेत'
खासदार राऊत म्हणाले, आम्ही काँग्रेससोबत देखील राहिलो. आहो इंदिरा गांधींना देखील आम्ही पाठिंबा दिला आहे. आमचे वैचारिक मतभेद आहेत पण काँग्रेसचे योगदान विसरता येणार नाही. ही रक्ताची नाती आहेत. आता कुठे राज ठाकरे यांनी मत व्यक्त केले आहे. त्यावर उद्धव ठाकरे हे देखील व्यक्त झाले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number