संजय राऊतांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

संजय राऊतांची २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पत्राचाळ प्रकरणात कारवाई कऱण्यात आली आहे, आजपासून राऊतांचा मुक्काम आर्थर रोड कारागृहात असणार आहे. पत्राचाळ प्रकरणी ईडी कोठडीत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची रवानगी आता न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. कथित पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी संजय राऊत यांना ३१ जुलै रोजी रात्री उशीरा ईडीनं अटक […]

संजय राऊतांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

संजय राऊतांची २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पत्राचाळ प्रकरणात कारवाई कऱण्यात आली आहे, आजपासून राऊतांचा मुक्काम आर्थर रोड कारागृहात असणार आहे. पत्राचाळ प्रकरणी ईडी कोठडीत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची रवानगी आता न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. कथित पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी संजय राऊत यांना ३१ जुलै रोजी रात्री उशीरा ईडीनं अटक केली होती.

संजय राऊत यांच्यावर नेमके काय आरोप आहेत ?

पत्राचाळ घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेल्या प्रवीण राऊत याना HDIL ग्रुपकडून ११२ कोटी रुपये मिळाले. त्यातील १ कोटी ६ लाख ४४ हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले असा आरोप संजय राऊतांवर आहे. त्यातील पैशातून संजय राऊत यांनी अलिबाग येथील जमीन खरेदी केली असा दावा ईडीने कोर्टात केला आहे. याप्रकरणी ईडीने वर्षा राऊत यांचीही कसून चौकशी केली आहे.

जामिनाचा मार्ग मोकळा

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती. ८ ऑगस्टपर्यंत ते ईडी कोठडीमध्ये होते. आज ईडीची कोठडी संपत असल्यानं संजय राऊत यांना कोर्टात करणार हजर करण्यात आलं होतं. ईडीने त्यांची कोठडी न मागितल्याने त्यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आला. यानंतर आता संजय राऊतांचा जामिनीसाठी अर्ज करण्याचा पर्याय खुला झाला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number