Sanjay Raut : नार्वेकरांच्या मागे पुन्हा शुक्लकाष्ट! राऊतांकडून व्हिडीओ ट्विट, नेमकं प्रकरण काय?

मुंबई : विधानसभा अध्यक्ष आणि भाजप नेते राहुल नार्वेकर यांचा अलिबागमधील एक व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओत राहुल नार्वेकर काही स्थानिकांसोबत दिसून येत आहेत. हा व्हिडीओ खासदार संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट केला आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत याबाबत भाष्य करताना सांगितले की, गेल्या काही काळापासून अलिबागमध्ये मोक्याच्या जमिनी ताब्यात घेऊन […]

Sanjay Raut : नार्वेकरांच्या मागे पुन्हा शुक्लकाष्ट! राऊतांकडून व्हिडीओ ट्विट, नेमकं प्रकरण काय?

मुंबई : विधानसभा अध्यक्ष आणि भाजप नेते राहुल नार्वेकर यांचा अलिबागमधील एक व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओत राहुल नार्वेकर काही स्थानिकांसोबत दिसून येत आहेत. हा व्हिडीओ खासदार संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट केला आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत याबाबत भाष्य करताना सांगितले की, गेल्या काही काळापासून अलिबागमध्ये मोक्याच्या जमिनी ताब्यात घेऊन त्या गुजरात लॉबीला देण्याचे उपक्रम सुरु आहेत. नार्वेकर बंधू या जमिनी शेतकऱ्यांनी विकाव्या यासाठी किती परिश्रम घेतं आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यलय आणि महसूल विभागाला कसा दबाव आणत आहेत. जी काही माहिती आहे ती मी द्यायला तयार आहे. पण कोकणाच्या जमिनी हिसकावून घेणं आणि जमिनी ताब्यात घेऊन अलिबागला गुजरात करणं हे सुरु आहे. म्हात्रोलीत एका शेतामध्ये मोजणीसाठी हे अधिकाऱ्यांना घेऊन गेले. गुजरातच्या माणसाची नजर त्यावर पडली. मालक घरात नसताना हे सरकारी अधिकारी विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे गेले. संपूर्ण कुटुंब तिथे आलं. पण आधी कोणाकोणाच्या कानफाटात त्यांनी मारली, त्याचा व्हिडीओ आता येईल. त्यांच्या जमिनी हिसकावून घेतं आहेत. कोकणचा गुजरात करत आहेत. मी त्या कुटुंबाचं अभिनंदन करतो. त्यांनी महाराष्ट्रला दाखवलं की सत्ताधाऱ्यांची पात्रता काय आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, सामान्य जनतेच्या शेतीचे, संपतीचे चौकीदार आहेत. विधानसभा अध्यक्षपदावर बसलेला व्यक्ती असं वर्तन करत आहे. ते खोटं बोलत आहेत की, भांडण सोडवायला गेलेलो. शनिवारी रविवारी हे महाशय तिथे असतात जमिनीवर पाहणी करायला गेले होते. गुजरातच्या असंख्य ठेकेदारांनी अलिबागसारखे शांत शहर भंग केले आहे, असे राऊत म्हणाले.

हेही वाचा : ST Workers Protest : ST कर्मचाऱ्यांची 24 तारखेला आंदोलनाची हाक; सरकारच्या निषेधार्थ आझाद मैदानात करणार ‘बोंब मारो’ आंदोलन

काय आहे संजय राऊत यांची पोस्ट 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number