भाजपकडून शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याच्या आशयाचा आरोप शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी केला होता. तसेच छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेना नेते आंबादास दानवे यांनी दोन्ही शिवसेना एकत्र यायला हव्या अशी इच्छा व्यक्त केल्यानंतर शिवसेना विलीनीकरणाच्या चर्चांना जोर धरला आहे. याचपार्श्वभूमिवर शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी संजय राऊत म्हणाले की, “एखादी निवडणूक हारली म्हणजे शिवसेना कमकुवत झाली, असे नाही… आता निवडणुका नाहीत, त्यामुळे पक्षबांधणीचे काम सुरू… काँग्रेसवाले आपली संस्थानं वाचवण्यासाठी शेपट्या घालून भाजपमध्ये गेले… या लोकांना पक्ष नसतो, जिकडे हवा तिकडे हे लोक जातात… उद्या केंद्रात राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली सरकार आले, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले तर हेच लोक आमच्या पायाशी लोटांगण घालतील…”
पुढे अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यावर म्हणाले की, “भाजप स्लो पॉइजन आहे असं एक गृहस्थ म्हणाले.. पॉइजन काय असते हे त्यांना कळेल आता…. भाजप हा शेतकरी विरोधी आणि उद्योगपती धार्जिणा पक्ष आहे, असं ज्यांना वाटतं त्यांनी मातोश्रीवर यावं.. भाजपमध्ये अनेकजण आयात केलेले… भविष्यात भाजपाचा अध्यक्ष बाहेर देशातील झाला तर नवल वाटायला नको.. कोर्ट सत्ताधाऱ्यांच गुलाम… सगळे संघाचे लोक भरलेत.. आमच ऐकलं जात नाही.. शिंदे गटातील काही लोकांना पश्चाताप होत असेल, तर त्यांनी आमच्याकडे परत यावं…”
“सुप्रीम कोर्टाचा निकाल आमच्याच बाजूने लागेल, त्यामुळेच निकाल लांबवला जातोय.. ज्यांना पश्चाताप होतोय त्यांनी परत यावं, मात्र काही लोकांना प्रवेश मिळणार नाही… विखे पाटील आमच्याही पक्षात आले होते.. आम्हाला सोडून गेले, तेव्हाच आम्ही त्यांना श्रद्धांजली दिली. विखे पाटील अनेक पक्ष फिरले, भाजपमध्ये किती दिवस राहतील. सत्ता बदलली की पक्ष बदलणारे हे लोक आहेत.”