Sanjay Raut: ‘निवडणूक आयोग भाजपचा हस्तक’; संजय राऊतांचा थेट हल्लाबोल

मुंबईत भाजपला रोखण्यासाठी काँग्रेससह महाविकास आघाडी एकत्र येणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट करत निवडणूक आयोगावरही टीका केली.

Sanjay Raut: ‘निवडणूक आयोग भाजपचा हस्तक’; संजय राऊतांचा थेट हल्लाबोल

मुंबई: नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांच्या निकालानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक महत्त्वपूर्ण विधानं केली. पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच त्यांनी निवडणुकांमधील यशाबद्दल काँग्रेस पक्षाचे अभिनंदन केले. अमरावती, चंद्रपूर आणि वर्धा या भागांमध्ये काँग्रेसला नगरपालिका निवडणुकांमध्ये चांगले यश मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

महाविकास आघाडीबाबत भूमिका स्पष्ट करताना राऊत म्हणाले की, महाविकास आघाडी सोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना असावी, असे त्यांना वाटते. मुंबईमध्ये काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढण्याच्या तयारीत असल्याचे संकेत असून, मुंबईबाहेर युतीसाठी काँग्रेस तयार आहे. काँग्रेसकडे त्यांची स्वतःची काही राजकीय गणिते असतील, असेही त्यांनी सांगितले. मात्र, मुंबईमध्ये भाजपला शह देायचा असेल तर महाविकास आघाडीसोबत काँग्रेसने एकत्र यायला हवे, असे मत त्यांनी स्पष्टपणे मांडले.

हेही वाचा: RBI Repo Rate: रेपो रेट घटला, पण बँक हफ्ता जैसे थे! आरबीआयच्या पतधोरणामागचे ‘हे’ गुपित तुम्हाला माहित आहे का?

मनसे आणि शिवसेना युतीबाबत मोठे विधान करताना संजय राऊत यांनी सांगितले की, दणदणीत पद्धतीने आणि वाजतगाजत मनसे आणि शिवसेना युतीची घोषणा लवकरच होणार आहे. हा क्षण ऐतिहासिक असून तो महाराष्ट्राच्या मराठी माणसासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या युतीची घोषणा गुलाल उधळत केली जाईल, असे ठाम वक्तव्यही त्यांनी केले.

दरम्यान, भाजपाच्या विजयावर वर्तमानपत्रांत झळकणाऱ्या “भाजपाची धुरंदर भूमिका, धुरंदर विजय” अशा मथळ्यांवर टीका करताना राऊत म्हणाले की, धुरंदर हे पात्र सुजवलेले आणि फुगवलेले असून ते पूर्णतः काल्पनिक आहे. या पात्राचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. जे बिहारमध्ये घडले, तेच काल महाराष्ट्रातील नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांमध्ये घडले, असे सांगत त्यांनी निवडणूक प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

निवडणूक आयोगावर थेट आरोप करत संजय राऊत म्हणाले की, भारतीय निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्ष किंवा शिंदे गटाचा हस्तक असल्यासारखा वागत आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवी चर्चा सुरू झाली असून, आगामी काळात युती आणि आघाड्यांच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा: Mumbai Local Train: भयंकर! रेल्वेत महिलांच्याच डब्यातून तरुणाचा प्रवास, उतरण्यास सांगितल्यानं त्यानं तरुणीलाचं धावत्या लोकलमधून फेकले खाली

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number