संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट

रविवारी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी खासदार शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट

मुंबई: रविवारी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी खासदार शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. खासदार संजय राऊत लिखित ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाचे औपचारिक निमंत्रण देण्यासाठी ही भेट झाली होती. या भेटीबद्दलची माहिती शरद पवार यांनी समाज माध्यमातून दिली.

हेही वाचा: ‘जे तुमची घरं तोडायला येतील त्यांना सांगा…’; राज ठाकरे एल्फिन्स्टनच्या रहिवाशांच्या पाठीशी

खासदार संजय राऊत यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर खासदार शरद पवार यांनी या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. खासदार शरद पवार म्हणाले की, ‘राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी आज माझ्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीच्या वेळी त्यांनी आपल्या लेखणीतून साकारलेल्या ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाचे औपचारिक निमंत्रण दिले. या भेटीदरम्यान रोहन तावरे यांनी लिहिलेल्या वन्यजीवनावर आधारित पुस्तकावर सविस्तर चर्चा झाली. त्याचप्रमाणे, राज्य आणि देशातील विविध मुद्द्यांवरही विचारमंथन झाले. भेटीनंतर मी त्यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या’.

कधी होणार पुस्तक प्रकाशन?

खासदार संजय राऊत लिखित ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकाचे प्रकाशन 17 मे रोजी रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे होणार असून या कार्यक्रमासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राज्यसभेचे खासदार शरद पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यासोबतच, कवी, गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number