Sanjay Raut: “मतदारांना पैसेवाटप करून महाराष्ट्राची निवडणुक संस्कृती बिघडली”; राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप

संजय राऊत यांनी माध्यमांसमोर संवाद साधत राज्यातील निवडणुकांपासून प्रचार खर्चापर्यंत अनेक मुद्द्यांवर टीका केली.

Sanjay Raut: “मतदारांना पैसेवाटप करून महाराष्ट्राची निवडणुक संस्कृती बिघडली”; राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप

मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी आज माध्यमांसोबत संवाद साधताना आपल्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती दिली. संजय राऊत यांना कॅन्सरचे निदान झाले आहे आणि अनेक दिवसांपासून ते या आजारावर उपचार घेत होते. आज त्यांनी बऱ्याच दिवसांनी पत्रकारांची संवाद साधत सध्याच्या राजकारणाच्या परिस्थितीवर भाष्य केले. ते म्हणाले “डॉक्टरांची मुख्य टीम माझ्यावर उपचार करत आहे. रेडिएशन थेरपीचा मुख्य टप्पा संपलेला आहे. इतर काही उपचार सुरू आहेत आणि रिकव्हरीही चांगल्या प्रकारे चालू आहे,” असे राऊत यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले, “मी स्वस्त बसणारा माणूस नाही. तब्येत ठीक असती, तर नगरपालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी मी महाराष्ट्रभर फिरलो असतो.” राऊत यांनी यावेळी शिंदे गटावरही जोरदार शब्दांत टीका केली. “उद्या मतदान होणार आहे आणि त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे आज ‘लक्ष्मी दर्शन’ होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. शिंदे गटातील काही नेत्यांनीच असे आश्वासन दिल्याचे समोर येत आहे. निवडणूक आयोगाने याकडे तातडीने लक्ष दिले पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली. “एका मंत्र्यानेच ‘आज मतदारांना दहा ते पंधरा हजारांचे लक्ष्मी दर्शन होणार’ असे विधान केले आहे. हा प्रकार लोकशाहीला घातक आहे,” असा टोला राऊत यांनी थेट गुलाबराव पाटलांना लगावला.

हेही वाचा: Shirur Accident: शिरूर हादरलं! आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या गाडीची 4 वर्षीय चिमुकलीला जोरदार धडक; प्रकृती गंभीर

राज्यातील नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकांवर मोठा खर्च होत असल्याचा आरोपही राऊत यांनी केला. “या निवडणुका लढवण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर उच्चपदस्थ नेते प्रत्यक्ष प्रचारात उतरले आहेत. याआधी कधीही खाजगी विमाने आणि हेलिकॉप्टरचा एवढ्या प्रमाणात वापर झाला नव्हता. या निवडणुकांना अनावश्यक महत्त्व दिले जात आहे,” अशी टीका त्यांनी केली.

शिवसेनेच्या (उबाठा) भूमिकेबाबत बोलताना राऊत म्हणाले, “आम्ही नेहमीप्रमाणे जबाबदारी स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांवर सोपवली आहे. विरोधक सक्रिय नाहीत असे म्हटले जाते, पण हे वास्तव नाही.” पुढे ते म्हणाले, “राज्याची निवडणूक संस्कृती गेल्या चार-पाच वर्षांत अत्यंत खराब झाली आहे. पैशांचा उधळपट्टीतून लोकशाही विकृत होत आहे. हे सर्व देवेंद्र फडणवीस यांच्या काळात सुरू झाले.”

शेवटी शिंदे गटावर थेट प्रहार करत राऊत म्हणाले, “शिंदेंची शिवसेना मला पहिल्यापासूनच मान्य नाही. शिंदे सेनेचा कोथळा अमित शाहच बाहेर काढणार आहेत, हे माझे वाक्य तुम्ही लिहून ठेवा.” त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.

हेही वाचा: Nashik Crime News: नाशिकमध्ये नववधूच्या गूढ मृत्यूसंदर्भात नवा तपास; सासरी सापडलेल्या बिब्बा नागाच्या खिळ्यामुळे वाढला सस्पेन्स

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number