Sanjay Raut: पक्षांतर करणाऱ्यांवर राऊतांची सडकून टीका, तर अमोल कोल्हेंबाबत म्हणाले, "यांच्यामध्ये जाण्याचा विचार जे करतील…"

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अमोल कोल्हेंच्या विधानावर महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.  तसेच सचिन अहिर यांच्या पक्षांतरावर बोचरी टीका केली आहे. 

Sanjay Raut: पक्षांतर करणाऱ्यांवर राऊतांची सडकून टीका, तर अमोल कोल्हेंबाबत म्हणाले, &quotयांच्यामध्ये जाण्याचा विचार जे करतील…&quot

शिवसेना ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर इतर पक्षांनी अलर्टमोड चालू केला. ठाकरेंच्या पक्षात मोठी बंडखोरी झाल्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे बंडखोरीचे बोट दाखवले जात होते. राष्ट्रवादीचेही काही आमदार खासदार फुटणार अशा चर्चांनी जोर धरला होता. असं असताना शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कोडकौतुक केले. एवढचं नव्हे तर जर ऑफर आली तर विचार करेल असे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात अनेकांच्या भुवया पुन्हा उंचावल्या आहेत. याचपार्श्वभूमिवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.  तसेच नुकतीच सचिन अहिर यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकल्यानंतर शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतले. त्यांच्या या पक्षप्रवेशावर राऊतांनी बोचरी टीका केली आहे. 

“मला माहित नाही माझ्याकडे माहिती नाही. उद्धव ठाकरे जा म्हणून म्हणाले का, उत्तर काय ते सांगा? सन्माननीय उद्धव ठाकरे असे म्हणाले की, वा वा छान छान सचिन अहिर तुम्ही उत्तम निर्णय घेतला… असे म्हणाले का त्यांचे कुठेतरी व्यथा वेदना त्यांनी व्यक्त केली…. ज्यांच्या उद्धव साहेबांनी अनेक कामात विश्वास ठेवला, ते जर अशा प्रकारे बेइमानी करून जात असतील तर त्या नेत्याची भावना काय असेल… गोंधळ उगाच निर्माण करू नका…”

हेही वाचा- Sushma Andhare : ‘पडद्यामागे काय घडतंय…’, अंधारेंनी स्पष्टच सांगितलं; महायुतीकडून ठाकरेंचा नेता अर्ज भरतोयं, यावरही केलं भाष्य, पाहा व्हिडीओ

“ऑपरेशन टायगर ऑपरेशन तुतारी एक दिवस ऑपरेशन कमळ सुद्धा होईल आपापसात… काल तामिळनाडूमध्ये टीव्ही के पक्षाचे आमदार फोडण्याचा प्रयत्न केला 35-35 कोटी पश्चिम बंगालमध्ये त्रिमूळ काँग्रेस आमदार आणि खासदार यांच्यावर हल्ले सुरू आहेत. या देशाचे राजकारण इतका खालच्या पातळीवर नेऊन ठेवला आहे. भारतीय जनता पक्षाने भविष्यामध्ये सांगावा लागेल या देशात तेव्हा कधी लोकशाही होती. आता आपण जे काय म्हणत आहे..

ऑपरेशन तुतारी आता ह्याच्यावरती मी काय बोलू? डॉक्टर अमोल कोल्हे यांनी जर असे विधान केलं असेल, तर ते दुर्दैव आहे. मी त्यांना ओळखतो ते छत्रपती संभाजी राजे यांची भूमिका करतात सध्या महात्मा फुले यांच्या भूमिकेत आहेत. छत्रपती संभाजी आणि महात्मा फुले हे स्वाभिमानी आणि धर्माविमानी आणि त्यांच्या भूमिकेत शिरणारी व्यक्ती ही धर्मग्रह आणि विचार द्रोह करण्यात नाही. याची माझ्यासारख्या त्यांच्या चाहत्याला खात्री वाटते. महायुतीची जर त्यांनी भूमिका मांडली असेल तर महायुतीमध्ये कोण आहे? महायुतीमध्ये धर्मद्रोही आणि रामद्रोही आहेत.

राम मंदिराच्या दानपेट्ट्या लुटणाऱ्या पक्षात कोणी जाणार का? किंवा हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाशी बेईमानी करणाऱ्या शिंदे यांच्या गटात कोणी जाणार का? हे सगळे एकत्र आहेत हे रामद्रोही आणि हिंदुद्रोही एकत्र आहेत. यांच्यामध्ये जाण्याचा विचार जे करत असतील किंवा जे गेले आहेत त्यांना सुद्धा इतिहास धर्मद्रोही रामद्रोही म्हणून यांची गणना केली जाईल. कोणत्या अर्थाने कोल्हे बोलले आहेत मला माहिती नाही किंवा कोल्हे हे जेव्हा शिवसेनेबरोबर होते तेव्हा त्यांनी शिवसेनेत एक निष्ठेने काम केलं.

माननीय शरद पवार साहेब यांच्या बरोबर गेले आता त्यांच्याबरोबर ते काम करत आहेत आणि कोल्हे यांना निवडून आणण्यामागे त्या भागातल्या हजारो शिवसैनिकांची मेहनत आहे. हे आमच्या जिल्ह्यातले जिल्हाप्रमुख आहेत त्यांना विचारा कोल्हे यांना निवडून आणण्यामागे मोर्चा तो मतदार संघ शिवसेनेचा आहे. फक्त अमोल कोल्हे आहेत, आमचे पडद्यावरचे संभाजी महाराज आहेत, म्हणून आम्ही सगळ्यांनी त्यांना मनापासून त्यांचं काम केलं. त्याच्यामुळे अमोल कोल्हे यांनी दिले काहीही वक्तव्य केले असेल तरी ते मूळ पक्षात राहतील याच्याविषयी माझ्या मनात काहीही शंका नाही. मुळात ती जागा महायुतीची नाही ती जागा शिवसेनेची आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि ती जागा जिंकण्याची क्षमता फक्त आमच्या मध्ये आहे आमचा साधा शिवसैनिक सुद्धा ती जागा जिंकू शकतो असा तो मतदार संघ आहे. “

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number