Sanjay Dina Patil Apology: ‘मी मनापासून क्षमा मागतो…’, अखेर संजय दिना पाटलांनी मागितली पत्रकारांची माफी

माझ्यात आणि पत्रकारांमध्ये घडलेल्या प्रकाराबद्दल मी मनापासून क्षमा मागतो&quot, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Sanjay Dina Patil Apology: ‘मी मनापासून क्षमा मागतो…’, अखेर संजय दिना पाटलांनी मागितली पत्रकारांची माफी

ठाकरे गटाची साथ सोडून अलीकडेच शिवसेनेत दाखल झालेले खासदार संजय दिना पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पत्रकारांशी झालेल्या वादादरम्यान त्यांनी कथितरित्या धमकीवजा वक्तव्य केल्याचा आरोप होत आहे. “यापुढे पुन्हा आलात तर मारून टाकीन,” असे ते म्हणाल्याचा दावा करण्यात येत असून, या घटनेची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. संजय दिना पाटील यांनी एका व्हिडिओद्वारे पत्रकारांची माफी मागितली आहे. ते म्हणाले की, “बोलताना माझ्याकडून काही अयोग्य शब्दांचा वापर झाला, याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, असे त्यांनी म्हटले. माझ्यात आणि पत्रकारांमध्ये घडलेल्या प्रकाराबद्दल मी मनापासून क्षमा मागतो”, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या घटनेमागील कारण सांगताना संजय दिना पाटील म्हणाले की, “ज्या दिवसापासून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला, त्या दिवसापासून त्यांच्यावर सातत्याने टीका होत असून त्यांचा अपमान केला जात आहे. हा अपमान त्यांनी सहन केला. मात्र, आज सकाळी काही पत्रकार त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आले होते. त्यावेळी पक्षप्रवेशाबाबत कोणतेही प्रश्न विचारू नयेत, मला जे काही सांगायचे होते ते मी आधीच सांगितले आहे, अशी विनंती मी त्यांना नम्रपणे आणि हात जोडून केली होती, असे त्यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले की,  “शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय पूर्णपणे माझा वैयक्तिक निर्णय आहे आणि त्यासाठी माझ्यावर टीका होत असेल तर ती मी स्वीकारू शकतो, असे संजय दिना पाटील यांनी स्पष्ट केले. मात्र, या वादात त्यांच्या कुटुंबीयांना लक्ष्य केले जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. माझ्या पत्नीबाबत आणि वडिलांबाबत चुकीच्या व खोट्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. त्यामुळे माझ्या कुटुंबाला या राजकीय वादापासून दूर ठेवावे, अशी विनंती मी वारंवार करत आलो आहे”, असे त्यांनी सांगितले.

आज सकाळीही याच मुद्द्यांवर काही पत्रकारांनी प्रश्न विचारले. त्यावेळी मी त्यांना नम्रपणे थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र परिस्थिती हळूहळू चिघळत गेली. या दरम्यान माझ्याकडून काही अयोग्य आणि आक्षेपार्ह शब्दांचा वापर झाला. त्या घटनेबद्दल संबंधित पत्रकारांसह संपूर्ण पत्रकार बांधवांची मी मनापासून माफी मागतो, असे त्यांनी म्हटले. तसेच, माझ्या राजकीय भूमिकेवर किंवा शिवसेनेतील प्रवेशावर टीका करण्यात कोणतीही हरकत नाही, परंतु माझ्या कुटुंबीयांना या वादात ओढू नये, अशी विनंती त्यांनी पुन्हा एकदा केली. असं ते शेवटी म्हणाले. 

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number