बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आपल्या पक्षात येण्यास इच्छुक आहे आणि लवकरच तो रासप मध्ये प्रवेश करणार असल्याचे रासपचे अध्यक्ष मंत्री महादेव जानकर यांनी आपल्या पक्षाच्या वर्धापनदिनी बोलताना म्हटलं. आजच ते प्रवेश करणार होते. ते बाहेर गावी असल्याने 25 सप्टेंबरला ते प्रवेश करणार असल्याचे जानकर यावेळी म्हणाले होते. मी कुठलाही राजकीय पक्षात जाणार नाही असं संजय दत्त यांनी स्पष्ट केलं आहे.
आजच ते प्रवेश करणार होते. 25 सप्टेंबर ही तारीख घेतली होती मात्र आज 25 आगस्टला ते येणार होते ते बाहेर गावी असल्यामुळे ते येऊ शकले नाही ते रासपमध्ये प्रवेश करणार असल्याचे महादेव जानकर यांनी म्हटलं होत.
आगामी विधानसभा मी माझ्या पक्षाच्या चिन्हावर लढवणार आहे. 57 जागा मागितल्या वाटल्यास जागा कमी द्या पण माझ्या चिन्हावर लढू द्या. असं ही ते म्हणाले होते.
परंतु मी कुठल्याही राजकीय पक्षात जाणार नाही असा खुलासा अभिनेता संजय दत्त यांनी केला आहे. महादेव जानकर माझे चांगले मित्र आहे. त्यांना भविष्यासाठी मी शुभेच्छा देतो असं ही ते म्हणाले होते.