Sangli Zilla Parishad Election Results 2026: सांगली जिल्हा परिषदेत भाजप नंबर वन,शरद पवार गटाने काँग्रेसला टाकलं मागे

सांगली जिल्हा परिषद निवडणुकीत प्राप्त कलांनुसार भाजप 16 जागांवर आघाडीवर आहे.

Sangli Zilla Parishad Election Results 2026: सांगली जिल्हा परिषदेत भाजप नंबर वन,शरद पवार गटाने काँग्रेसला टाकलं मागे

सांगली : जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालांमध्ये सांगली जिल्ह्यात भाजपने आघाडी घेतल्याचे स्पष्ट चित्र समोर आले आहे. एकूण 61 गटांच्या निवडणुकीत विविध पक्षांमध्ये चुरस पाहायला मिळत असली तरी सध्याच्या घडीला भाजप सर्वाधिक जागांवर आघाडीवर आहे.

प्राप्त कलांनुसार भाजप 16 जागांवर आघाडीवर असून जिल्ह्यात आपला प्रभाव टिकवून ठेवताना दिसत आहे. काँग्रेस 09 जागांवर आघाडीवर आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) 10 जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा: Kolhapur ZP Panchayat Samiti Result 2026: कोल्हापुरात सतेज पाटलांचा करिष्मा? 40 जागांचे कल हाती; काँग्रेसने मारली मोठी मुसंडी, वाचा संपूर्ण निकाल

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) 05 जागांवर आघाडीवर असून, शिवसेना शिंदे गट 04 जागांवर पुढे आहे. शिवसेना ठाकरे गट 01 जागेवर आघाडीवर असल्याची नोंद आहे.

सांगली जिल्ह्यातील या निकालांमुळे राजकीय समीकरणांमध्ये हालचाल सुरू झाली आहे. उर्वरित गटांचे अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतरच जिल्हा परिषदेतील सत्तेचे चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र, सध्याच्या घडीला भाजपने आघाडी घेतल्याने राजकीय वातावरणात उत्सुकता वाढली आहे.

दरम्यान, मतमोजणीची प्रक्रिया सुरू असून प्रत्येक फेरीनंतर चित्रात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर जिल्हा परिषदेतील सत्ता कोणाच्या हातात जाणार याचे स्पष्ट चित्र समोर येईल. सध्या तरी सांगली जिल्ह्यात भाजपने आघाडी घेतली असली, तरी उर्वरित जागांचे निकालच अंतिम राजकीय समीकरण ठरवणार आहेत.

हेही वाचा: Latur ZP Result 2026 : लातूरमध्ये मनसेचा ‘इंजिन’ सुस्साट; राज ठाकरेंच्या शिलेदारांनी उधळला विजयाचा गुलाल

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number