कोल्हापूर : शालेय सहलीची बस पलटल्याची घटना घडली आहे. ही बस कोल्हापुरातील जोतिबा रोडवर पलटली आहे. यात 11 विद्यार्थिंनी आणि 3 शिक्षक असे एकूण 14 जण जखमी झाले आहेत.
सांगली जिल्ह्यातील विटा इथल्या इंदिराबाई भिडे कन्या प्रशालेची ही बस होती. जोतिबा दर्शन करून कोल्हापुरकडे परतताना दानेवाडी जवळ ही घटना घडली. सकाळी 3 बसेसद्वारा पन्हाळा, जोतिबा आणि कणेरी मठ या ठिकाणी सहलीसाठी या विद्यार्थिनी आल्या होत्या.
अपघाताची माहिती मिळताच तातडीने रुग्णवाहिकेतून विद्यार्थिनींना सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.