भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी इस्लाम धर्मातील बहुपत्नीत्व प्रथेचा उल्लेख करत मुस्लिम महिलांच्या हक्कांबाबत चिंता व्यक्त केली. त्यांनी पाकिस्तानमध्ये बहुविवाहाचे प्रमाण अत्यल्प असल्याचे सांगत या विषयावर प्रश्न उपस्थित केला. यावर सना मलिक यांनी भाजप आमदारांना जोरदार प्रत्युत्तर दिले.
देवयानी फरांदे यांनी मुस्लीम महिलांबद्दल काही प्रश्न उपस्थित केले आहेत. अशाप्रकारच्या अत्याचार मुस्लीम महिलांवरच होतो का? बहुपत्नीत्वाला मुस्लीम धर्मात मंजुरी आहे. पाकिस्तानने काही नवीन केलं नाही, पाकिस्तानने कुराणमध्ये जे सांगितलं आहे, त्याची अंमलबजावणी केली आहे. भारतामध्येही कुराणची अंमलबजावणी करावी, ही आमची मागणी आहे. तिहेरी तलाक ही तलाखची एक पद्धत आहे, तलाख ए हसन, तलाख अहसन हे दोन्ही आम्ही पाळतो. तलाख ए बिद्दत ही वेगळी संस्कृती आहे, त्याचा आमच्या धर्मात कुठेही उल्लेख नाही.
पुढे त्या म्हणाल्या की, “तिहेरी तलाक रद्द करण्यात आला, कायदा आणण्यात आला, भारतात जे अस्तित्त्वात नव्हतं ते रद्द करण्यात आलं. त्याचा अवलंब होत असता, त्यावर कायदा झाला असता, त्याच्या विरोधात कोणी गेलं असतं, तर आम्ही त्याविरोधात आवाज उठवला असता. बहुपत्नीत्व फक्त मुस्लिमांमध्येच अस्तित्त्वात का, मुस्लीम पुरुषच अनेक महिलांशी लग्न करतात का? दुसऱ्या धर्मांमध्येही बहुपत्नीत्व आहे, फक्त मुस्लीम धर्मात बहुपत्नीत्वासाठी कायदा आहे”, असे सना मलिक यांनी स्पष्ट केले.