समीर वानखेडेंनी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगापुढे सादर केली सर्व कागदपत्रे

  क्रुझवरील ड्रग्जप्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. त्यामुळे या आरोपानंतर समीर वानखेडे यांनी राष्ट्रीय मागासवर्गीय जाती आयोगाचे अध्यक्ष सुभाष रामनाथ पारधी यांची भेट घेतली. तसेच वानखेडे यांनी राष्ट्रीय मागासवर्गीय जाती आयोगापुढे सर्व कागदपत्रे सादर केली आहेत.  समीर वानखेडे यांनी घटस्फोट, विवाह प्रमाणपत्र, अनुसूचित […]

समीर वानखेडेंनी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगापुढे सादर केली सर्व कागदपत्रे

  क्रुझवरील ड्रग्जप्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. त्यामुळे या आरोपानंतर समीर वानखेडे यांनी राष्ट्रीय मागासवर्गीय जाती आयोगाचे अध्यक्ष सुभाष रामनाथ पारधी यांची भेट घेतली. तसेच वानखेडे यांनी राष्ट्रीय मागासवर्गीय जाती आयोगापुढे सर्व कागदपत्रे सादर केली आहेत.

 समीर वानखेडे यांनी घटस्फोट, विवाह प्रमाणपत्र, अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र तसेच पहिल्या पत्नीकडून झालेल्या मुलाचा जन्मदाखला यासंबंधी सर्व कागदपत्रे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगापुढे सादर केली आहेत. यावर समीर वानखेडे म्हणाले, मी राष्ट्रीय मागासवर्गीय जाती आयोगाकडे सर्व कागदपत्रे सादर केली आहेत. मी केलेल्या तक्रारीची चौकशी करण्यात येणार असून आयोगाचे अध्यक्ष सुभाष पारधी याबाबत उत्तर देतील, असे ते म्हणाले. समीर वानखेडे यांनी सादर केलेल्या सर्व कागदपत्रांची योग्य पडताळणी करून तपासणी करणार असल्याचे राष्ट्रीय मागासवर्गीय जाती आयोगाचे अध्यक्ष सुभाष रामनाथ पारधी यांनी सांगितले.

  यापूर्वी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी मुंबईतील एनसीबी विभागाचे संचालक समीर वानखेडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. अरुण हलदर यांनी यावेळी समीर वानखेडे यांच्याकडे अनुसूचित जातीशी संबंधित कागदपत्रांची पाहणी केली. तसेच अनुसुचित जातीच्या कोणत्याही अधिकाऱ्यावर केलेले आरोप खपवून घेतले जाणार नसल्याचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी सांगितले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number