संभाजीराजे पोलीस ठाण्यात हजर

विशाळगड येथे दगडफेक आणि तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह सुमारे शिवभक्तांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

संभाजीराजे पोलीस ठाण्यात हजर

कोल्हापूर : विशाळगड येथे दगडफेक आणि तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह सुमारे शिवभक्तांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. गुन्हा नोंदवल्यानंतर पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. पोलीस कारवाई सुरू होताच संभाजीराजे छत्रपती पोलीस ठाण्यात हजर झाले. 

विशाळगडावर अतिक्रमण होत असताना प्रशासनाने दुर्लक्ष केले. आता हे अतिक्रमण हटवण्यासाठी आंदोलन केल्यावर आंदोलकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. प्रशासन स्वतःच्या चुकांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत आहे, असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले. सर्वांनी संयम बाळगावा आणि कायद्याचा सन्मान करावा, असे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केले. भाजपाच्या नितेश राणेंनी ट्वीट केले आणि विशाळगड मुक्तीसंघर्ष करणाऱ्यांना पाठिंबा दिला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number