Sambhajinagar Crime : संभाजीनगर हादरलं! उमेदवारी नाकारल्याचा राग, भाजपच्या जिल्हा सरचिटणीसाला बेदम मारहाण

कन्नड तालुक्यातील चिंचखेडा येथील भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीसांवर हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 

Sambhajinagar Crime : संभाजीनगर हादरलं!  उमेदवारी नाकारल्याचा राग,  भाजपच्या जिल्हा सरचिटणीसाला बेदम मारहाण

संभाजीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कन्नड तालुक्यातील चिंचखेडा येथील भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीसांवर हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातील औराळा पंचायत समिती गणातून भाजपकडून निवडणुकीची उमेदवारी नाकारल्यामुळे इच्छुक उमेदवार रामदास खवळे यांनी जिल्हा सहचिटणीस सुभाष काळे यांच्यावर हल्ला केल्याची घटना घडली. 

हेही वाचा – Badlapur Crime : बदलापूरात अवघ्या चार वर्षाच्या चिमुकलीवर स्कूल व्हॅनचालकाचा अत्याचार; आरोपी अटकेत 

उमेदवारी नाकारलेल्या उमेदवाराकडून हा हल्ला करण्यात आला असून यात काळे यांचा पाय फ्रॅक्चर झाला, दरम्यान मारहाण करण्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये इच्छुक उमेदवाराच्या हातात लाकडी दांडा प्रत्यक्ष दिसून येत आहे.

हेही वाचा – Sahar Sheikh Controversy : 'कैसे हराया…?' बोलणाऱ्या सहर शेखवर कारवाई करा', भाजपा नेत्याची मागणी 

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, माजी जि.प. सदस्य सुरेश गुजराणे यांच्या कार्यालयात उमेदवारी संदर्भात चर्चा सुरू असताना हा प्रकार घडला. या हल्ल्यात काळे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कन्नड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number