Sambhajinagar Crime : मैत्रिणीनेच केला विश्वासघात, कपडे बदलतानाचा व्हिडीओ चित्रित केला आणि…; छत्रपती संभाजी नगरमधील धक्कादायक प्रकार उघड

व्हिडिओ आणि फोटो काढून ते आपल्या एका प्रियकराला पाठवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Sambhajinagar Crime : मैत्रिणीनेच केला विश्वासघात, कपडे बदलतानाचा व्हिडीओ चित्रित केला आणि…; छत्रपती संभाजी नगरमधील धक्कादायक प्रकार उघड

छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको भागातील एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात अतिशय धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ज्या मैत्रिणीसोबत एकाच रूममध्ये राहून सुख-दु:ख शेअर केली तिनेच विश्वासघाताची सीमा ओलांडली आहे. हॉस्टेलवर राहणाऱ्या एका तरुणीनं आपल्या रूममेटचे कपडे बदलतानाचे गुपचूप व्हिडिओ आणि फोटो काढून ते आपल्या एका प्रियकराला पाठवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सोबत राहणाऱ्या मैत्रिणीनेच एका तरुणीचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ चोरून चित्रित करून ते आपल्या प्रियकराला पाठवल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून सिडको पोलीस ठाण्यात संबंधित तरुणी आणि तिचा प्रियकर स्वराज धालगडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचा – Delhi Police Action: राजधानीमध्ये 'ऑपरेशन कवच' अंतर्गत 70 जण पोलिसांच्या ताब्यात, नेमकं काय घडलंय? 

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी तरुणी या दोघीही अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत असून गेल्या तीन वर्षांपासून एकाच वसतिगृहात राहत होत्या. 19 जानेवारी रोजी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास आरोपी तरुणी आपल्या प्रियकराशी फोनवर संशयास्पद संभाषण करत असल्याचे पीडितेच्या लक्षात आले. फोनवर बोलताना "फोटो आणि व्हिडिओ कसे वाटले? हॉट आहेत का?" असे शब्द वापरत असल्याचे ऐकून पीडितेचा संशय बळावला. त्यानंतर पीडितेने आरोपी तरुणीला रंगेहाथ पकडत तिचा मोबाइल ताब्यात घेतला. 

हेही वाचा – Horrific Road Accident: महामार्गावर मृत्यूचा थरार; ट्रक आणि इनोव्हाच्या धडकेत सहा ठार; कारचा अक्षरशः चक्काचूर 

पासवर्ड विचारून मोबाइल तपासला असता कपडे बदलतानाचे आपलेच व्हिडिओ आरोपी तरुणीने चोरून काढून ते तिच्या प्रियकराला पाठवल्याचे उघड झाले. या प्रकारामुळे मानसिक धक्का बसलेल्या पीडित तरुणीने तात्काळ सिडको पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी संबंधित तरुणी आणि तिचा प्रियकर यांच्याविरोधात आयटी अ‍ॅक्टसह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number