‘गजानना अवलीया, अवतरले जग ताराया’, ‘गण गण गणात बोते’ च्या गजरात विदर्भाची पंढरी शेगाव येथे संत श्री गजानन महाराज यांचा 142 वा प्रकटदिन लाखो भाविकांच्या साक्षीने उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान या उत्सवात राज्यभरातील तब्बल दीड हजाराच्यावर दिंड्या संतनगरीत दाखल झाल्या होत्या. यानिमित्ताने भाविकांचीही मोठी गर्दी सध्या विदर्भपंढरीत होत आहे.
दुपारी मेणा, गज व अश्वासह श्रींची पालखी नगर परिक्रमेला निघाली.
यावेळी अनेकांनी श्रींच्या पालखीवर पुष्पवृष्टी केली.
दिंड्यांच्या आगमनामुळे संतनगरीत भक्तीमय वातावरण झाले होते.
श्री संत गजानन महाराज यांचा प्रकटदिन उत्सवाच्या निमित्ताने श्री.गजानन महाराज संस्थानमध्ये उत्सवाची भरगच्च तयारी करण्यात आली होती.
दररोज किर्तनाचा कार्यक्रम असे धार्मिक कार्यक्रम संस्थान मध्ये चालले.
याचा शेगावकरांसह विदर्भातील हजारो भाविकांनी लाभ घेतला.
दरम्यान या उत्सवात राज्यभरातील तब्बल दीड हजाराच्यावर दिंड्या शेगावी दाखल झाल्या होत्या.
भाविकांचीही मोठी गर्दी सध्या संतनगरीत होत आहे.
श्रींच्या दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या होत्या.
अत्यंत शिस्तीत भक्तांनी श्रींचे दर्शन घेतले.
गुलाबपुष्प गुलाल उधळून श्रींचा प्रकट सोहळा भक्तिभावाने साजरा करण्यात आला.
यावेळी महारुद्रस्वाहाकार यज्ञाची पुणार्हूती संपन्न झाली.
प्रकटदिनी श्रींचा पालखी रथ, मेणा, गज अश्वासह मंदिरातून नगर परिक्रमा काढण्यात आली. ही पालखी संपूर्ण शहरात फिरून परत मंदिरात पोहचली.
यावेळी शहर ठिकठिकाणी श्री भक्तांच्या वतीने चहा, नाश्ता, फराळ, व महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. अनेकांनी श्रींच्या पालखीवर पुष्पवृष्टी केली. यावेळी शेकडो भजनी दिंड्यांसह सुमारे दोन लाख भाविकांची उपस्थिती होती.