राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या तीनही उमेदवारांनी बाजी मारली. तर शिवसेनेचा एक उमेदवार पराभूत झाल्यामुळे मविआला मोठा धक्का बसला. त्यानंतर आता राज्यसभेच्या निवडणुकीनंतर सर्वांचे लक्ष विधानसभा निवडणुकीकडे लागले आहे. दरम्यान, आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून सदाभाऊ खोत यांनी विधानसभा निवडणुकीचा अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता भाजपचे पाच उमेदवार विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरणार आहेत.
विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून पाच जणांना उमेदवारी देण्यात आला आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, श्रीकांत भारतीय उमा खापरे, यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच रयतक्रांती मोर्चाचे नेते सदाभाऊ खोत यांनी अपक्ष निवडणुक लढवण्याचे जाहीर केले होते. मात्र, आता सदाभाऊ खोत यांनी निवडणुकीचा अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकही चुरशीची ठरणार असल्याचे चित्र दिसत आहे.
सदाभाऊ खोत यांनी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे आता भाजपकडून पाच उमेदवार रिगंणात उतरले आहेत. तर महाविकासआघडी सहा जागांवर निवडणूक लढवणार आहे.
राष्ट्रवादीचे शिवाजीराव गर्जे यांनीही विधानसभा निवडणुकीसाठी डमी अर्ज भरला होता. मात्र, शिवारीराव गर्जे यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे आता येत्या २० जून रोजी विधान परिषद निवडणूक होणार असून ११ उमेदवार निवडणुका होणार आहेत.