मातोश्रीवर ‘या’ दिग्गजांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि लिटील मास्टर सुनील गावसकर यांनी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेतली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच सचिन तेंडुलकर आणि सुनील गावसकर यांनी ही सदिच्छा भेट घेतली. सचिन आणि सुनील गावसकर यांनी उद्धव ठाकरेंना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं. यावेळेस आमदार आदित्य ठाकरे तसेच तेजस ठाकरे हे उपस्थित होते. […]

मातोश्रीवर ‘या’ दिग्गजांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि लिटील मास्टर सुनील गावसकर यांनी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेतली.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच सचिन तेंडुलकर आणि सुनील गावसकर यांनी ही सदिच्छा भेट घेतली.

सचिन आणि सुनील गावसकर यांनी उद्धव ठाकरेंना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं. यावेळेस आमदार आदित्य ठाकरे तसेच तेजस ठाकरे हे उपस्थित होते.

तब्बल तासभर या दोघांनी मातोश्रीवर पाहुणचार घेतला. या दोन्ही दिग्गज नेत्यांनी एकाच वेळी भेट घेतल्याने अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

तसेच वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी देखील मातोश्रीवर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

NRC आणि CAA कायद्याविरोधात वंबआकडून 26 डिसेंबरला मुंबईत धरणं आंदोलन करण्यात येणार आहे.

या आंदोलनाची माहिती घेण्यासाठी उद्धव ठाकरेंनी प्रकाश आंबेडकरांना निमंत्रित केले होते.

हे आंदोलन शांततेने पार पडेल अशी ग्वाही प्रकाश आंबेडकरांनी दिली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number